तरुण भारत

एफएटीएफ : पाकची धडपड

वृत्तसंस्था/इस्लामाबाद :

फायनान्शियल ऍक्शन टास्फ फोर्सच्या (एफएटीएफ) काळय़ा यादीत सामील होण्यापासून वाचण्यासाठी पाकिस्तानने धडपड चालविली आहे. एफएटीएफची पुढील बैठक ऑक्टोबरमध्ये होणार आहे. या बैठकीपूर्वी पाकिस्तानच्या संसदेचे अधिवेशन आयोजित करण्यात आले असून यात तीन विधेयके संमत करण्यात आली आहेत. कोरोना विषाणूच्या विरोधातील लढाईत ज्याप्रकारे यश मिळविले, त्याचप्रकारे एफएटीएफच्या करडय़ा यादीतून बाहेर पडण्यास यशस्वी ठरू असे उद्गार पंतप्रधान इम्रान खान यांनी काढले आहेत. पाकिस्तानने कोरोनाविरोधी लढाईत भारत आणि युरोपलाही मागे टाकल्याचा दावा इम्रान यांनी केला आहे.

Advertisements

संसदेत तीन विधेयके संमत केल्याप्रकरणी त्यांनी सहकारी पक्षांचे आभार मानले आहेत. एफएटीएफच्या करडय़ा यादीतून बाहेर येण्यासाठी विरोधक सरकारला पाठिंबा देतील अशी अपेक्षा होती. परंतु विरोधक केवळ स्वतःचा विचार करत आहेत. त्यांच्याकडून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होत असला तरीही त्यांना यश मिळणार नाही. विरोधकांनी 34 दुरुस्त्या सुचविल्या असून त्या मान्य करणे अशक्य असल्याचा दावा इम्रान यांनी केला आहे.

एफएटीएफने  करडय़ा यादीतून बाहेर येण्यासाठी पाकिस्तानवर अनेक प्रकारची कठोर अटी लादल्या आहेत. संमत झालेली तिन्ही विधेयके याच्याशीच संबंधित आहेत. इस्लामाबाद कॅपिटल टेरेटिरी वक्फ प्रॉपर्टीझ बिल, अँटी मनी लॉन्ड्रिंग बिल 2020 आणि अँटी टेररिजम बिल संमत करण्यात आले आहे. वक्फ बोर्डाच्या मालमत्तांवर देखरेख ठेवण्याच्या दृष्टीकोनातून पहिले विधेयक मांडण्यात आले होते. वक्फ बोर्डांच्या मालमत्तांचा गैरवापर रोखण्याची सूचना एफएटीएफने पाकिस्तानला केली होती.

Related Stories

देवभूमीत महा‘आपत्ती’

Patil_p

अयोध्या : राम मंदिराच्या पायाभरणीस प्रारंभ

datta jadhav

गिरिराज सिंग यांचे वादग्रस्त विधान

Patil_p

अरविंद सावंत यांनी उठविला सीमाप्रश्नावर लोकसभेत आवाज

Patil_p

मोनोक्लोनल अॅन्टिबॉडीच्या वापराला परवानगी द्या; झायडसची डीसीजीआयकडे मागणी

triratna

ममता बॅनर्जी यांच्या भावाचे कोरोनाने निधन

datta jadhav
error: Content is protected !!