तरुण भारत

चीनसोबत तणाव, बोफोर्स होणार तैनात

वृत्तसंस्था/ लेह :

पूर्व लडाखमध्ये चीनसोबत तणाव वाढल्याने सैन्याने आगामी थंडीचा काळ विचारात तयारी सुरू केली आहे. भारतीय सैन्य तेथे बोफोर्स हॉवित्झर तोफा तैनात करणार आहे. तर सीमावर्ती क्षेत्रात सामग्रीच्या पुरवठय़ासाठी वायुदलाने सर्वात मोठे वाहतूक विमान सी-17 ग्लोबमास्टर आणि आयएल-76 ल्युशिनला तैनात केले आहे. याचबरोबर चिनूक हेलिकॉप्टरही या कामात वापरले जात आहे.

Advertisements

सैन्यात सीमावर्ती क्षेत्रात कुठल्याही अडथळय़ाशिवाय आणि वेगवान पुरवठय़ाची यंत्रणा विकसित केली आहे. सी-17, आयएल-79 विमाने दररोज तंबू, कपडे, खाद्यसामग्री, पाण्याच्या बॉटल्स यासारख्या गोष्टी घेऊन लडाखमध्ये पोहोचत आहेत. लडाखच्या विविध भागांमध्ये सी-17 आणि आयएल-76 विमाने सामग्री पोहोचवित आहेत. तेथे सैन्याकडून संबंधित सामग्री सॅनिटाइज केली जाते आणि त्यानंतरच चिनूक हेलिकॉप्टरद्वारे ही सामग्री सीमेवर पोहोचविली जात आहे.

चिनूकद्वारे दिवसभर विविध सीमाक्षेत्रात पुरवठय़ाचे काम चालते. विविध राज्यांमधून ही सामग्री लडाखमध्ये आणणे आणि नंतर सीमाक्षेत्रावर पाठविण्यास काही तासांचा कालावधी लागत असल्याचे सैन्याधिकाऱयाकडून सांगण्यात आले आहे.

बोफोर्स तोफांची निगा

सैन्याचे अभियंते बोफोर्स तोफांचे सर्व्हिसिंग करत आहेत. या तोफा काही दिवसांत सीमेवर तैनात केल्या जाणार आहेत. सीमाक्षेत्रात सैन्याच्या तयारीसंबंधी सर्व्हिसिंग आणि देखभालीच्या कामाबद्दल लेफ्टनंट कर्नल प्रीति कंवर यांनी माहिती दिली आहे. वर्कशॉपमध्ये सैन्याचे अभियंते विशेष परिस्थितीत आवश्यक असणाऱया शस्त्रास्त्रांची देखभाल करत असतात. टेक्निकल स्टोअर ग्रूप्स एका रणगाडय़ाच्या फायरिंग पिनपासून इंजिनपर्यंत सर्व गोष्टी उपलब्ध करतात. मोबाईल स्पेयर्स व्हॅनद्वारे सीमाक्षेत्रात तंत्रज्ञांसाठी सुटेभाग पोहोचवित असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

कारगिल युद्धात कमाल

बोफोर्स तोफा 1980 च्या दशकात सैन्यात सामील झाल्या होत्या. या लो आणि हाय अँगलद्वारेही मारा करू शकतात. या तोफा युद्धात विजय मिळविण्यास उपयुक्त ठरल्या आहेत. 1999 मध्ये पाकिस्तानच्या विरोधात कारगिल युद्धात विजय मिळविण्यास महत्त्वाची भूमिका बजावली होती. बोफोर्स तोफांनी अत्यंत उंच  पर्वतांवरील पाकिस्तानचे बंकर आणि तळ सहजपणे नष्ट केले होते. बोफोर्स तोफांच्या माऱयामुळे पाकिस्तानी सैन्याचे प्रचंड नुकसान झाले होते.

Related Stories

बिहार : सिवानचे माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीन यांचे निधन

Rohan_P

संजय राऊतांकडून अदानी एअरपोर्ट नामफलक हटवल्याचे समर्थन

triratna

भारतात कोरोना सध्या दुसऱ्या टप्प्यात

tarunbharat

पुदुच्चेरीचे काँग्रेस सरकार पराभूत

Patil_p

देशात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 1 हजार 380 रुग्णांची भर 

prashant_c

फेसबुकप्रकरणी लष्कराला दिलासा नाही

datta jadhav
error: Content is protected !!