तरुण भारत

सोलापूर : करमाळा तालुक्यात आज ४३ कोरोना पॉझिटिव्ह

प्रतिनिधी / करमाळा

करमाळा तालुक्यातील कोरोणाबाधितांची संख्या ही वरचेवर वाढतच असून तरीपण नागरीक मनसोक्त वावरत असल्याचे दिसून येते, करमाळा शहरातील मेनरस्त्यावरील दुकाने ही गजबजून गेलेली असतात, रस्त्यावरही तमाम गर्दीत नागरीकांची रहेंदळ पहावयास मिळत आहे.   
 
करमाळा शहरासह तालुक्यात आज एकूण २७९ रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या आहेत. यामध्ये ४३ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून  यात २२ पुरुष तर २१ महिलांचा समावेश आहे.

आज करमाळा शहरात १५० रॅपिड टेस्टमध्ये २६ जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असून यामध्ये  कृष्णाजीनगर २ पुरुष, १ महिला किल्ला ३ पुरुष, ३ महिला खडकपुरा २ पुरुष कानाडगल्ली १ पुरुष, ६ महिला, कुंकूगल्ली २ पुरुष, १ महिला , वेताळ पेठ १ पुरुष जुनी कन्या शाळा १ महिला, शिवाजीनगर २ तर ग्रामीण भागात १२९ रॅपिड टेस्टमध्ये  १७ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. जेऊर ३ पुरुष, १ महिला, आळजापूर १महिला, वंजारवाडी १ महिला,कुंभेज १ पुरुष ,शेलगाव १ पुरुष, १ महिला ,कोळगाव १ पुरुष करंजे १ पुरुष ,जिंती १ पुरुष, १ महिला, केतूर २ महिला, केम १ पुरुष, १ महिला यांचा समावेश आहे.

Related Stories

बॅंड-बेन्झो कलाकारांचे प्रश्न राज्य शासनाच्या माध्यमातून तातडीने सोडविणार

Patil_p

नियम पाळल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल

Patil_p

साडेचार लाख रुपयांच्या तांब्याच्या तारेची चोरी

datta jadhav

जेईई, नीट परिक्षेत छ. शाहू ऍकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे यश

Patil_p

विकासामध्ये ग्रामसेवकांची महत्वाची भूमिका

Patil_p

जिह्यात ढगाळ वातावरण

Patil_p
error: Content is protected !!