वृत्तसंस्था /मुंबई :
चालू वित्त वर्षामध्ये 15 सप्टेंबरपर्यंत एकूण कर संकलन वर्षाभराच्या अगोदर या कालावधीच्या तुलनेत 22.5 टक्क्मयांनी कमी राहून 2,53,532.3 कोटी रुपयांवर राहिले आहे, अशी माहिती आयकर विभागाकडून उपलब्ध झाली आहे.
अर्थव्यवस्थेमधील मंदीकडे पाहिल्यास एकूण कर संकलन पहिल्या तिमाहीमध्ये काही प्रमाणात सुधारण्याची अपेक्षा होती. जून तिमाहीत एकूण कर संकलनात वर्षभरातील तुलनेत जवळपास 31 टक्क्मयांची घसरण राहिली होते. मागील वित्त वर्षामध्ये 15 सप्टेंबर 2019 पर्यंत एकूण कर संकलन 3,27,320.2 कोटी रहिले होते. परंतु त्यामध्ये चालू तिमाहीतील आगाऊ कर संकलनाचे आकडे वेगळे सांगण्यास नकार दिलेला आहे.
चालू आर्थिक वर्षातील 15 सप्टेंबरपर्यंत एकूण संकलनातील व्यक्तीगत प्राप्तीकर 1,47,004.6 कोटी रुपये आणि कॉर्पोरेट प्राप्तीकर 99,126.2 कोटी राहिलेला आहे. या दोन्ही उत्पन्नाच्या संकलनाचे प्रमुख घटक आहेत आणि या दोन्हींचे मिळून एकूण कर संकलन 2,46,130.8 कोटी रुपये राहिलेले आहे. कर उत्पन्नात अन्य दोन हिस्सेदारीची देवाणघेवाण यामध्ये होते. यात एकटय़ा मुंबईतून 7,078.9 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्ती होत असल्याची माहिती आहे.