तरुण भारत

नार्वेतील सप्तकोटेश्वर मंदिराला चढतोय नवीन साज

      रविराज च्यारी/प्रतिनिधी

    6 एप्रिल 1668 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हस्ते जिर्णोद्धार करून उभारलेल्या डिचोली तालुक्मयाच्या नार्वे गावातील श्री सप्तकोटेश्वर मंदिराला सध्या राज्म सरकारच्या पुरातत्व खात्यातर्फे नवीन साज चढत आहे. या मंदिराच्या कामाला खात्यातर्फे नेमण्यात आलेल्या कंत्राटदाराने चांगलीच गती दिली होती खरी. मात्र कोरोना महामारीच्या समस्येमुळे य कामाच्या गतीला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. सध्या कामाची गती धिमी झाली असून सरकारकडून सदर कामाच्या कंत्राटदाराला अपेक्षेप्रमाणे निधीची पुरवण होत नसल्यानेही या कामाची गती पूर्वीप्रमाणे राखणे कंत्राटदाराला शक्मय होत नसल्याचे दिसून येत आहे.

Advertisements

     छत्रपती शिवाजी महराजांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मंदिरांना पुनर्जीवन दिले. तसेच नवीनही मंदिरे उभारली मात्र स्वतःच्या हस्ते महाराजांनी जीर्णोद्धार केलेले हे एकमेव मंदिर असावे, असे जाणकारांकडून समजते. सध्या मंदिर उभे असलेल्या मागील बाजूस जांभ्या दगडांना कोरून मंदिराचा आकार साकारण्यात आलेल्या ठिकाणी एका गुहासदृष्य जागी श्री सप्तकोटेश्वराचे सप्तधातूचे लिंग होते. त्याला छप्पर नव्हते. तेथे अभिषेक करण्यास बसलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्मयावर पोफळीचे झावळ आणि एक पाण्याचा थेंड पडला.  त्यांनी शिवपिंडीवरील अभिषेक पूर्ण करीत “देव उघडय़ावर आहे. त्याला छप्पराची गरज आहे” अशी भावना व्यक्त करीत मंदिर उभारणीचा संकल्प सोडला. आणि लागलीच त्यांनी स्वतःच्या हस्ते या मंदिराचा जिर्णोध्दार 6 एप्रिल 1668 साली केली.

श्री सप्तकोटेश्वर मंदिर आणि शिवाजी महराजांचा गुप्त हेतू.

   सांस्कृतिक आणि धार्मिक संचिताचे एक महत्वपूर्ण प्रतिक बनलेले हे मंदिर अनेक ऐतिहासिक घडामोडी?चे साक्षीदार म्हणून उभे आहे. इ.स. 1664 साली शिवाजी महाराजांनी भतग्राम महाल जिंकून घेतला होता. त्यावेळी अर्थातच नार्वे गाव जेथे सप्तकोटेश्वराचे मंदिर होते ते गाव शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखाली होते. साहजिकच महाराजांचे लक्ष गोमंतक जिंकून पोर्तुगीजांचे गोव्यातून उच्चाटन करण्याकडे होते. पण त्याकाळी पोर्तुगीज आरमाराशी उघड टक्कर देऊन आपला हेतू साध्य करणे सोपे नव्हते याची जाणीव महाराजांना होती. यासाठीच त्यांनी राजकारण किंवा राजकीय कारस्थान रचताना आपदा गुप्त हेतू साध्य करण्याच्या दिशेने जाणे आवश्यक होते. पोर्तुगीजांचे गोमंतकातील सत्तेचे मुख्य केंद्र जे जुने गोवे शहर ते श्री सप्तकोटेश्वर देवस्थानपासून दावजेच्या मार्गे एका तिसाप क्षाही कमी अंतरावर असल्याने तेथे राहून सर्व तयारी केली व त्या केंद्रावर अचानकपणे छापा घातला तर आपला इष्ट हेतू साध्य होणे शक्मय होईल. असे मनात धरून व पोर्तुगीजांस आपल्या हेतूचा किंवा हालचालींचा काहीच संशय येऊ नये म्हणून श्री सप्तकोटेश्वर मंदिर बांधण्याच्या हेतूने महाराज काही निवडक लोकांनिशी नार्वे येथे मुक्काम करून राहिले. त्या बांधकामासाठी सामान जमविण्याच्या निमित्ताने त्यांनी अनेक लहान लहान तुकडय़ा गोवे (आताचे जुने गोवे) शहरात शिरविल्या. या प्रकारे हि संख्या वाढवित नेऊन एका रात्रीत अचानकपणे हल्ला करावा असा त्यांचा गुप्त हेतू होता. पण याच सुगावा ’जुवांव नुसिस हे कुंज कोन्ही हे सां व्हिसेत’ या पोर्तुगीज व्हाइसरायला लागल्यामुळे त्याने हे कारस्थान आपल्याला कळल्याचे शिवाजी महाराजांच्या वकिलांना बोलावून आणून सांगितले. तसेच मराठज लोकांस गोवे शहरातून हाकलून लावले. हि गोष्ट नोव्हेंबर 1668 मध्ये घडली. शिवाजी महाराजांचे ते कारस्थान यशस्वी झाले असते तर गोवा म्हणजे तिसवाडी, सासष्टी आणि बार्देश हे मुलूख तीनशे वर्षांपूर्वीच मुक्त झाले असता. आणि या ऐतिहासिक घडामोडीत श्री सप्तकोटेश्वर मंदिराच्या नावावर महत्वपूर्ण घटनेची नोंद झाली असती. याच महिन्याच्या 13 तारखेला श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा जिर्णोध्दार करण्याचे आज्ञापत्र शिवाजी महाराजांनी दिले. आणि सदर मंदिराचा जिर्णोद्धार होऊन मंदिर बांधकामास प्रारंभही झाला होता.

12 जाने 2019 रोजी सरकारच्या पुरातत्व खात्यातर्फे पुनः मंदिर जिर्णोद्धार सोहळा.

   या ऐतिहासिक मंदिराचा अंतर्गत छप्पराचा भाग तसेच बाहेरील आकाराचा भाग व इतर अनेक गोष्टी जर्जर बनत चालल्याने या देवस्थान समितीकडून सरकारदरबारी पुरातत्व खात्यातर्फे मंदिराचे नुतनीकरण व्हावे अशी आर्त मागती होती. या मागणीला याच कार्यकाळातील तत्कालीन पुरातत्व खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांनी आत्मयितेने मनात घेतले. आणि मंदिर नुतनीकरणाची फाईल तत्काळ हातावेगळी केली. त्यामुळे सदर मंदिराच्या नुतनीकरणाचा पुनः जिर्णोद्धार सोहळा 12 जाने. 2019 रोजी पार पडला होता. त्यास शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, तत्कालीन मंत्री विजय सरदेसाई, आमदार प्रवीण झांटय़? व इतरांची उपस्थिती होती.

लगेचच वेगवानपणे कामाला प्रारंभ. कुशल कारागिरांच्या हस्ते काम.

  12 जाने. रोजी या मंदिर नुतनीकरण जिर्णोद्धार सोहळा संपन्न झाल्यानंतर लगेचच या मंदिर नुतनीकरणाच्या कामाला मुंबईतील कंत्राटदार निलेश ठक्कर यांनी प्रारंभही केला. सदर कामाची गती प्रारंभी चांगलीच होती. मंदिरातील जुने सामान हटविताना नव्याने साकारण्यात येणारे नक्षीदार आकाराचे काम तज्ञ आणि कुशल कारागिरांच्या हस्ते करण्यात येत होते. या कामात सिमेंटचा कोणताही उपयोग केला जात नाही. तर पूर्वीच्या रचनेप्रमाणे केवळ गुळ, चुना आणि एक विशिष्ट प्रकारच्या फळांचा रस याचे मिश्रण करून काम केले जात आहे. प्रत्येक विभागाच्या कामाला वेगवेगळय़ा कारागिरांच्या तुकडय़ा आहेत. त्या त्या तज्ञ कारागिरांच्या तुकडी मार्फत कामे हाताळली जात आहेत.

नुतनीकरणात आढळली गुप्त गुंफा, गुप्त कक्ष, बुजविलेली विहीर, काही प्राचीन भांडी व सामान.

   नार्वेतील श्री सप्तकोटेश्वर मंदिर म्हणजे एक ऐतिहासिक संचित असून छत्रपती शिवाजी महाराजांचे गोमंतकाशी असलेले नाते आणि प्रेम कथन करणारी वास्तू आहे. या मंदिराचा ऐतिहासिक वारसा मोठा असल्याने मंदिर नुतनीकरणाच्या वेळी काही ऐतिहासिक गुपिते उघडण्याची शक्मयता काही इतिहास संशोधकांना आणि शिवप्रेमींनाही होती. त्यामुळे या घटकांमध्ये एकप्रकारचे चैतन्य निर्माण झाले होते. या चैतन्यालाही मंदिरात आढळून आलेल्या काही गुप्त गोष्टींमुळे उधाण आले असेलच. मंदिराच्या गर्भकक्षामागे भिंतीला प्लास्टर करण्यासाठी त्यावरील थर काढण्याचे काम चालू असताना उजव्या कोपऱयात एक पोकळी आढळून आली. सदर पोकळी खोलली असता एक माणसाच्या उंचीवर एक भुयार सापडले. सदर भुयारातून वर चढण्यासाठी पायऱया असून एका वेळी एकच माणूस आत जाऊ किंवा येऊ शकतो. सदर भुयारातून गेल्यावर गर्भकक्षाच्या वरील भागात मंदिराच्या घुमटीत एक गुप्त कक्ष आढळून आहे. सदर गुप्त कक्षाचा उपयोग गुप्त हेतू साध्य करून लपण्यासाठी होत असावा. मंदिराच्या गर्भकक्षाच्या बाहेरून दोन्ही बाजूंना भुयारे आढळून आली आहेत. मंदिराच्या बाहेर उजव्या बाजूला जमिन खोदकाम करण्यात येत असताना विहिर सदृश गोलाकार आकाराचा खंदक आढळला. सदर खंदकात भरलेली माती, दगड बाहेर काढण्यास प्रारंभ केला असता त्यात अनेक प्राचीन वस्तू आढळून आल्या आहेत. त्यात एक पाषाणी गणेशाची मुर्ती, दोन मातीची भांडी, एक पितळी शेषनाग, एकारती, पंचारती, घंटा, कोयता असे सामान सापडले आहे. सदर विहीर 35 – 40 फूट खोल आहे. सध्या मंदिराच्या अंतर्गत आणि बाहेरील भागाचे काम सुरू आहे. सदर काम संपुष्टात आल्यानंतर मंदिर परिसराच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. त्या कामावेळी आणखिनही अनेक गोष्टी, गुप्तमार्ग, भुयारे, गुंफा सापडण्यची शक्मयता नाकारता येत नाही.

कामाची गती मंदावली, काम वेळेत पूर्ण होण्याची शक्मयता कमी.

जाने. 2019 साली या मंदिर नुतनीकरणाची पायाभरणी झाल्यानंतर वेगवानपण कामाला प्रारंभ झाला होता. मंदिराचे मूळ काम ज्या पध्दतीने आणि ज्या प्रकारचे सामान वापरून केलेले आहे. त्याच पध्दतीने केले जात असल्याने सदर नक्षीदार कामाला काही प्रमाणात विलंबही लागतोच. मात्र 2020 वर्ष सुरसुरू होऊन मार्च महिन्यातच कोरोनामुळे लॉकडाउन जाहिर झाल्यानंतर या कामाला ब्रेक लागला. त्याचप्रमाणे उपलब्ध माहितीनुसार या कामात सरकारतर्फे योग्यप्रकारे निधीची पुरवण हैत नसल्यानेही व्यत्यय येत असल्याचे निदर्शनास येत आहे. तरीही या कामाच्या कंत्राटदाराकडून अजूंही काम पूर्णपणे बंद करण्यात आलेले नाही. धिम्या गतीने का होईना काम सुरूच आहे. सरकारने या कामासाठी सुमारे साडेसात कोटीची तरतूद केली होती. मात्र सध्या कोवीड महामारीमुळे सरकारच्या तिजोरीवर पडलेल्या परिणामाचा परिणाम या कामांवरही पडत असल्याचे दिसून येत आहे. या मंदाराची आणि देवाची एक मात्र ख्याती आहे की, या मंदिराच्या नुतनीकरण आणि सुशोभिकरणाचा विचार ज्या ज्या राजकारण्यांनी मनात आणून कार्याला प्रारंभ केला आहे, त्या राजकारण्याच्या राजकीय प्रवासाला दैवी आशिर्वाद प्राप्त झाले आहेत.

Related Stories

‘स्वयंपूर्ण’ चा प्रचारकच ‘परावलंबी’

Amit Kulkarni

ताप आल्याने बाबूश मोन्सेरात गोमेकॉत दाखल

Patil_p

‘अ डॉग अँड हिज मॅन’ निरपेक्ष प्रेमाची वेगळी कथा

Abhijeet Shinde

काणकोणात भाजी-मासेविक्रीत भलत्याच व्यक्तींचा शिरकाव

Omkar B

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक श्यामसुंदर रमाकांत नायक यांचे निधन

Amit Kulkarni

कोरोनाचे 4 बळी, 125 नवे रुग्ण

Omkar B
error: Content is protected !!