तरुण भारत

24 तासांमध्ये देशात कोरोनाचे 97,894 रुग्ण

वृत्तसंस्था / नवी दिल्ली :

भारतात कोरोनाच्या संक्रमितांचा आकडा 51 लाखाच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत 51 लाख 18 हजार 253 लोक कोरोनाने संक्रमित झाले आहेत. 24 तासात कोरोनाचे विक्रमी 97 हजार 894 नवे रुग्ण सापडले आहेत. गुरुवारपर्यंतच्या अखेरच्या चोवीस तासांत 1,132 लोकांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे आतापर्यंत 83 हजार 198 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या सुद्धा 40 लाख 25 हजार 79 इतकी झाली आहे. गुरुवारी विक्रमी 82 हजार 719 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 10 लाख 9 हजार 976 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Advertisements

कोरोना विषाणू महामारीविरुद्ध लढाईत भारतासाठी सप्टेंबर महिना भयावह ठरत आहे. भारतात 15 दिवसात 13 लाख 08 हजार 991 नवे रुग्ण समोर आले आहेत. तर, अमेरिकेत 5 लाख 57 हजार 657 प्रकरणे नोंदली गेली असून तिसऱया क्रमांकावर असलेल्या ब्राझीलमध्ये 4 लाख 83 हजार 299 नवे रुग्ण आढळले आहेत. एवढेच नाही तर विषाणूमुळे झालेल्या मृत्यूच्या यादीत सुद्धा भारत सर्वांत वर आहे. भारतात गेल्या 15 दिवसांच्या कालावधीत 16 हजार 307 लोकांचा मृत्यू झाला, तर अमेरिका आणि ब्राझीलमध्ये अनुक्रमे 11 हजार 461 आणि 11 हजार 178 मृत्यूंची नोंद झाल्याचे ‘वर्ल्डोमीटर’च्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

नितीन गडकरी पॉझिटिव्ह

केंद्रीय रस्तेनिर्माण परिवहन राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती गडकरी यांनी ट्विटरवर दिली आहे. ‘अशक्तपणा जाणवू लागल्याने डॉक्टरांचा सल्ला घेताच त्यांनी वैद्यकीय तपासणी करायला सांगितले. त्यात माझी कोविड 19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तब्येत ठीक आहे आणि मी आयसोलेशनमध्ये आहे. माझ्या संपर्कात जे लोक आले होते त्यांनी सावधानता बाळगावी, सर्व नियम पाळून सुरक्षित राहावे.’ असे ट्विट गडकरी यांनी केले आहे.

8 महिन्यात 6 कोटी चाचण्या

भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण वाढत असतानाच तपासणीची संख्याही पूर्वीच्या तुलनेत वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत 6 कोटीहून अधिक नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. बुधवारी 11 लाख 36 हजार 613 कोरोना नमुन्यांची तपासणी करण्यात आली. 6 कोटी 5 लाख 65 हजार 728 कोरोनाची चाचणी घेण्यासाठी सुमारे आठ महिने लागले. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजी येथे 23 जानेवारी रोजी भारतातील पहिल्या कोविड-19 नमुन्याची चाचणी घेण्यात आली होती.

Related Stories

जैश-ए-मोहम्मदकडून नव्या संघटनेची निर्मिती

Patil_p

‘पीएसएलव्ही-सी 51’चे यशस्वी प्रक्षेपण

datta jadhav

नाईट कर्फ्यू मागे

Patil_p

उत्तराखंडात मागील 24 तासात ‘या’ वर्षातील सर्वाधिक रुग्णांची नोंद

Rohan_P

भव्य रामप्रतिमा ‘टाईम स्क्वेअर’ मध्येही झळकणार

Patil_p

तीन राजधान्यांची योजना आंध्रकडून मागे

Patil_p
error: Content is protected !!