तरुण भारत

आर-पार लढाईसाठी सैन्य सज्ज!

लडाख, नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

पूर्व लडाखमधील तणावाच्या परिस्थितीत चीनला स्पष्ट संदेश देण्याच्या प्रयत्नात असताना भारतीय लष्करामधील लष्कराने बुधवारी एक मोठे विधान केले आहे. भारतीय लष्कराच्या अपूर्ण तयारीचा दावा चिनी माध्यमांनी केल्यानंतर “कोणत्याही परिस्थितीत मोक्मयाच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी भारतीय सैन्यबळ पूर्णपणे तयार आहे’’ असे वक्तव्य एका वरिष्ठ सैन्याधिकाऱयाने केले आहे. हिवाळय़ाच्या हंगामात युद्धाची परिस्थिती उद्भवली तरी सक्षम आणि बळकट असलेले भारतीय सैन्य चीनविरोधात लढा देण्यास मागे-पुढे हटणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Advertisements

चीनच्या प्रसारमाध्यमांकडून भारताचा अपप्रचार सुरू आहे. चीनच्या सैनिकांना मैदान व उच्च भागात युद्धाचा अनुभव नाही. हे लोक शहरी भागातून आले असून त्यांना ग्राउंड परिस्थितीची कल्पना नाही. भारतीय जवान मात्र उणे 35 तापमानातही सक्षमपणे लढू शकतात, असे बुधवारी लष्कराच्या नॉर्दन कमांडच्या प्रवक्त्याने निवेदनात स्पष्ट केले. भारत एक शांतताप्रिय देश आहे आणि आमच्या शेजाऱयांशी आपले संबंध नेहमीच चांगले राहावेत अशी आमची इच्छा आहे.  आम्हाला नेहमी संवादातून प्रश्न सोडवायचे असतात. अशा वेळी जेव्हा भारत आणि चीन यांच्यात मुत्सद्दी स्तरावर चर्चा चालू असतात, त्यावेळीही आम्ही लष्करी आघाडीवर पूर्णपणे तयार आहोत, असे भारतीय सैन्याने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे

अगदी छोटय़ा सूचनेवरही प्रत्येक परिस्थितीसाठी तयार

लडाख रेंजचे सर्व भाग सर्वात उंच पर्वतीय प्रदेशात येतात. नोव्हेंबर महिन्यात या भागात जोरदार बर्फवृष्टी होते. याशिवाय इथले किमान तापमान -30 ते -40 अंशांपर्यंत खाली येते. या थंड परिस्थितीत बऱयाच वेळा लडाखला जोडणारे रस्तेही बंद होतात. परंतु या सर्व अटी असूनही भारतीय सैन्य अशा परिस्थितीत युद्धाला सामोरे जाण्यास पूर्णपणे सक्षम आहे. आम्हाला अशा क्षेत्रात कर्तव्य बजावण्याचा दीर्घकाळ अनुभव आहे आणि आम्ही अगदी छोटय़ा सूचनेवरही कोणत्याही परिस्थितीत जाण्यास पूर्णपणे तयार आहोत, असे लष्करी प्रवक्त्याने स्पष्ट केले. तसेच सियाचीनसारख्या कठीण रणांगणात लढा देण्याचा आम्हाला अनुभव असल्याचेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.

भारतीय आरमार सज्ज

लडाखच्या सर्व भागात सैन्य दलासाठी आरोग्य, रेशन, शस्त्रे, कपडे, आवश्यक उपकरणांसह आधीच पुरेशी व्यवस्था केली गेली आहे. पूर्व लडाख येथे जाण्यासाठी दोन मार्ग तयार करण्यात आले आहेत. यातील एक मार्ग श्रीनगर-लेह महामार्गावरील झोजिला खिंडीत आहे. दुसरा मार्ग मनाली-लेह महामार्गावर रोहतांग मार्गे आहे. आता आम्ही धारच्या मार्गे लेहला एक नवीन मार्ग तयार केला असून हिमवर्षाव आणि भूस्खलनामुळे बंद होण्याची शक्मयताही कमी आहे. रोहतांग पासजवळील अटल बोगद्यासह लडाखच्या भागात सैन्याच्या हालचालीची क्षमता बरीच मजबूत केली आहे, असेही लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले.

मागच्या सहा महिन्यात

चीनची ‘घुसखोरी’ नाही!

केंद्रीय गृह मंत्रालयाची राज्यसभेत माहिती

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

मागच्या सहा महिन्यात चीनने घुसखोरी केलेली नाही असे केंद्रीय गृह मंत्रालयाकडून बुधवारी राज्यसभेतील सदस्यांना सांगण्यात आले. “मागच्या सहा महिन्यात भारत-चीन सीमेवर घुसखोरीची घटना घडलेली नाही’’ असे केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लिखित उत्तरात सांगितले. राज्यसभेतील भाजप खासदार डॉ. अनिल अग्रवाल यांच्या प्रश्नावर नित्यानंद राय यांनी हे उत्तर दिले.

राजनाथ सिंग यांनी मंगळवारी लोकसभेत बोलताना घुसखोरी या शब्दाचा वापर केला नव्हता. 1993 ते 1996 दरम्यान दोन देशांमध्ये झालेल्या कराराचे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने अनादर केला असे सांगितले होते. मात्र, दुसऱयाच दिवशी घुसखोरी, अतिक्रमण आणि आक्रमण या शब्दांमध्ये फरक असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट करत घुसखोरीसंबधी स्पष्ट भाष्य केले.

Related Stories

12 वर्षीय मुलीने केला तीन दिवस पायी प्रवास, मात्र घरी पोहोचण्यापूर्वीच झाला मृत्यू

prashant_c

अखेर समीर वानखेडेंची बदली

datta jadhav

योगी सरकारकडून पात्र विद्यार्थांना दिला जाणार लॅपटॉप

Rohan_P

‘कोविशिल्ड’च्या डोसमध्ये कोणताही बदल नाही

datta jadhav

ग्रंथपालाची परीक्षा रद्द, 6 जण अटकेत

Patil_p

‘म्युकरमायकोसिस’ला स्वस्त सॅनिटायझरही असू शकते जबाबदार

datta jadhav
error: Content is protected !!