तरुण भारत

पंजाबमधील कोरोना रुग्णांनी पार केला 90 हजारांचा टप्पा

ऑनलाईन टीम / चंदीगड : 


पंजाबमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. पंजाबमध्ये मागील 24 तासात 2 हजार 896 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 90 हजार 032 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.  

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील एकूण 90,032 रुग्णांपैकी 65 हजार 818 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 2 हजार 646 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

  • 21,568 रुग्णांवर उपचार सुरू 


ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 14 लाख 96 हजार 340 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 21 हजार 568 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 489 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 88 जण व्हेंटिलेटरवर आहेत. 

  • शहर   एकूण रुग्ण संख्या 
  • लुधियाना  15,291
  • जालंधर    10,695
  • पटियाला   9752
  • अमृतसर   7417
  • सास नगर  7727

Related Stories

ईशान्येकडील राज्यांमध्ये भूकंपाचे हादरे

Patil_p

देशात 66,999 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

लालूंच्या पक्षाला मोठा धक्का

Patil_p

सर्व मुद्दय़ांवर चर्चेची तयारी : पंतप्रधान

Patil_p

खूशखबर ! पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यास मुदतवाढ

Abhijeet Shinde

कोरोना लढ्यासाठी केंद्राने एसडीआरएफला दिला 8873 कोटींचा पहिला हप्ता

Rohan_P
error: Content is protected !!