तरुण भारत

सातारा जिल्ह्यातील विद्यार्थी चार वर्षे शिष्यवृत्तीपासून वंचित

शिष्यवृत्ती मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी / सातारा

Advertisements

सन 2016 मध्ये घेण्यात आलेल्या आर्थिकदृष्टय़ा मागास शिष्यवृत्ती परीक्षेतील पात्र लाभार्थी विद्यालयात हेलपाटे मारून थकले असले, तरी त्यांना न्याय मिळालेला नाही. सातारा जिह्यात 960 विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित असून 25 लाखांवर शिष्यवृत्तीचे पैसे मिळत नसल्याने पात्र विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 60 हजारांच्या आत असते. अशा कुटुंबातील इयत्ता आठवीचा विद्यार्थी आर्थिकदृष्टय़ा मागास शिष्यवृत्ती परीक्षा देतो. परीक्षा देऊन पात्र झालेल्या विद्यार्थ्याला केंद्र शासन प्रत्येक महिन्याला 500 रूपये याप्रमाणे वर्षाला सहा हजार रूपये शिष्यवृत्ती देते. पुढील शिक्षणात त्या शिष्यवृत्तीचा विद्यार्थ्याला उपयोग होतो. मात्र, सन 2016 मध्ये घेण्यात आलेल्या व परीक्षा देऊन पात्र लाभार्थी झालेल्या विद्यार्थ्यांना चार वर्षात एक रूपयाही मिळालेला नाही. या शिष्यवृत्तीसाठी माध्यामिक शाळेने केंद्र शासनाच्या वेबसाईटला रजिस्टेशन करावे लागते. ज्यांचे रजिस्टेशन झाले आहे. त्या शाळा पात्र लाभार्थीचे शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन प्रस्ताव पाठविते.ज्या शाळांचे रजिस्टेशन झालेले नाही. त्या शाळा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठवितात.

तो प्रस्ताव पुढे पुणे व पुन्हा दिल्ली कार्यालयाकडे जातो. ऑनलाईन प्रस्ताव पाठविलेल्या विद्यार्थ्यांची चार वर्षे शिष्यवृत्ती मिळालेली नाही. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात वंचित लाभार्थी व पालकांनी याबाबत चौकशी केली असता केंद्र शासनाने राज्याला निधी दिला नसल्याने राज्य शासनाने जिह्याला दिलेला नाही. या निधींबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू असून निधी मिळाल्याशिवाय विद्यार्थ्यांना पैसे देता येणार नाहीत, असे सांगितले आहे. सन 2016 पूर्वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती सदर लाभार्थी पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना मिळाल्याची धक्कादायक माहिती काही लाभार्थींनी सांगितली असून पाच किंवा सात वर्षांनंतर शिष्यवृत्ती मिळणार असेल, तर उच्च शिक्षणात या शिष्यवृत्ती फायदा काय ? 60 हजारांच्या उत्पन्नाची मर्यादा असणाऱया विद्यार्थ्याला आर्थिक परिस्थितीमुळे किंवा प्रत्येक महिन्याला मिळणारी शिष्यवृत्ती न मिळाल्याने शाळा सोडावी लागली असेल, तर त्यास जबाबदार कोण ? संबंधित यंत्रणेने तत्काळ शिष्यवृत्तीचे पैसे दिले नाहीत. तर पात्र लाभार्थी व त्यांच्या पालकांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

Related Stories

सातारा : आनंदवार्ता…चार महिन्यातील सर्वात कमी पॉझिटिव्हीटी रेट

Abhijeet Shinde

येत्या आठ दिवसात क्लॉड आल्वारिसविरोधी चळवळ

Patil_p

बुधवार, गुरुवार कमी दाबाने पाणी पुरवठा होणार

datta jadhav

सातारा तालुका पोलिसांची कारवाई

Patil_p

चारा छावणी भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Patil_p

सातारा : शिक्षक समुपदेशन कॅमेऱ्यात

datta jadhav
error: Content is protected !!