तरुण भारत

स्कोडाची नवी रॅपिड टीएसआय कार बाजारात दाखल

मुंबई

 ऑटोमोबाईल क्षेत्रातली कंपनी स्कोडा ऑटो इंडियाने आपली नवी रॅपिड टीएसआय ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची कार नुकतीच भारतीय बाजारात लाँच केली आहे. या गाडीची किंमत 9 लाख 49 हजार रुपये (एक्स शोरूम) इतकी असणार आहे. स्कोडाने काही दिवसांपूर्वीच रॅपिड टीएसआय (मॅन्युअल ट्रान्समिशन) ही गाडी बाजारात आणली होती. 999 सीसी तीन सिलेंडर टीएसआय पेट्रोल इंजिनसहची नवी कार ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येणार आहे. ही गाडी एक लिटर इंधनावर 16 किलोमीटरचे अंतर कापू शकणार आहे. पूर्वीच्या तुलनेमध्ये या नव्या गाडीची इंधन क्षमता अधिक चांगली असल्याने मायलेजही वाढून मिळणार आहे.

Advertisements

Related Stories

बजाजची नवी पल्सर 250 एफ लवकरच

Patil_p

मारुतीच्या कार्स तिसऱयांदा महागल्या

Patil_p

टोयोटा, निस्सानची वाहन विक्रीत चमक

Patil_p

एमजी मोटर्सची नवी ‘हेक्टर प्लस’ जानेवारीत

Patil_p

बीएस-4 वाहनांच्या विक्रीला मुदतवाढ

prashant_c

सोनालिकाचा इलेक्ट्रीक ट्रक्टर बाजारात

Omkar B
error: Content is protected !!