तरुण भारत

सांगली : पाऊसात खांद्यावर वाहिल्या त्याने चक्क 80 मेंढ्या

दिघांची मधील तिघांनी जपली माणुसकी

दिघंची / वार्ताहर

जीवापाड माया लावून सांभाळ केलेल्या तब्बल 80 मेंढ्या पुलाच्या पलीकडे अडकल्या.परंतु आपल्या जीवाची बाजी लावत दिघंची मधील गुंडाराज भाऊसो ढोक,सुरेश भाऊसो ढोक,गोविंद अरुण रणदिवे या तिघांनी चक्क खांद्यावरून मेंढ्या आणून रस्ता पार केला. आपण पाळलेल्या प्राण्यांविषयी असणारा जिव्हाळा व लावलेली माया दिघंची येथील या घटनेने अधोरेखीत झाली आहे.

सध्या आटपाडी तालुक्यात अतिवृष्टी सुरू आहे. संततधार वादळी पाऊसाने अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामध्येच दिघंची येथील भाकर ओढा पूल देखील पाण्याखाली गेला. भाकर ओढ्याच्या पलीकडे मेंढ्या चरण्यासाठी गुंडाराज भाऊसो ढोक, सुरेश भाऊसो ढोक, गोविंद अरुण रणदिवे हे तिघे गेले होते. पाऊसाला सकाळ पासून च सुरुवात झाली होती. त्यात दुपारी झालेल्या संततधार पाऊसाने येथील भाकर ओढ्याला पाणी आले .त्यामध्ये भाकर ओढ्याचा पूल पाण्याखाली गेला व वाहतूक बंद झाली. आता या सर्व मेंढ्या घरी सुरक्षित घेऊन जाण्यासाठी या तिघांची धडपड सुरू झाली परंतु पाऊस कमी होण्याची लक्षणे नव्हती व पाणी देखील वाढत चालले होते
वाहत्या पाण्यातून मेंढ्या तशाच नेल्या तर वाहून जाण्याचा मोठा धोका होता.

अखेरीस गुंडारज ढोक ने आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या खांद्यावरून एक एक करत तब्बल 80 मेंढ्या पुलाच्या एका टोकावरून दुसरीकडे वाहत नेल्या. एका टोकावर सुरेश ढोक यांनी गुंडारज च्या खांद्यावर मेंढ्या उचलून दिल्या तर पुलाच्या दुसऱ्या टोकावर गोविंद वाघमारे याने मेंढ्या उतरुन घेतल्या. आणि आपल्या सर्वच्या सर्व मेंढ्या सुरक्षित स्थळी आपल्या घरी नेल्या. आपल्या जीवाची बाजी लावून गुंडाराज भाऊसो ढोक, सुरेश भाऊसो ढोक, गोविंद अरुण रणदिवे या तिघांनी सर्व च्या सर्व मेंढ्या सुरक्षित आणल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर थकव्या ऐवजी जीव लावलेल्या मेंढ्या सुरक्षित झाल्या याचा आनंद जाणवत होता.

Related Stories

राष्ट्रवादीत परतण्यासाठीच ‘करेक्ट कार्यक्रमाची फिल्डींग’; मंत्री जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट

Abhijeet Shinde

सांगली : गाढवाची वरात महावितरणच्या दारात

Abhijeet Shinde

सांगली : शर्यती झाल्या, गुन्हाही दाखल

Abhijeet Shinde

कोल्हापूर : वारणा दूध संघाचे दिवाळीसाठी दूध उत्पादकांना ३० कोटी रुपये जाहीर

Abhijeet Shinde

सांगली : कंटेनमेंट झोन बाहेरील नाट्यगृहे, सांस्कृतिक कार्यक्रमांना सशर्त परवानगी

Abhijeet Shinde

मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्ग पूर्ववत

Abhijeet Shinde
error: Content is protected !!