वृत्तसंस्था
गेल्या आठवडय़ात झालेल्या अमेरिका ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे जेतेपद मिळविणारी जपानची 22 वर्षीय टेनिसपटू नाओमी ओसाकाने फ्रेंच ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेतून दुखापतीमुळे माघार घेतली आहे.
ओसाकाने गेल्या आठवडय़ात अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकताना अझारेन्काचा पराभव करून तिसरे ग्रॅन्डस्लॅम जेतेपद मिळविले. पॅरिसमध्ये 27 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान होणाऱया फ्रेंच ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत स्नायु दुखापतीमुळे सहभागी होऊ शकणार नाही, असे ओसाकाने स्पर्धा आयोजकांना कळविले आहे. ओसाकाने आतापर्यंत प्रेंच टेनिस स्पर्धेत तिसरी फेरी पार केलेली नाही.
फ्रेंच टेनिस स्पर्धेतून ओसाका तसेच ऑस्ट्रेलियाची टॉप सिडेड बार्टीने माघार घेतली आहे. पुरूषांच्या विभागात स्वीसचा फेडरर यावेळी फ्रेंच टेनिस स्पर्धेत सहभागी होणार नाही. काही दिवसांपूर्वी फेडररच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून या दुखापतीतून तो अद्याप पूर्ण बरा झालेला नाही.