तरुण भारत

दुसाळेचा जवान लेहमध्ये हुतात्मा

चीनी सैनिकांबरोबर झालेल्या चकमकीत सचिन जाधव यांना वीरमरण

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

भारत व चीन दरम्यान लेह लडाख येथे तणावपूर्ण वातावरण आहे. तीन दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीत देशासाठी लढताना पाटण तालुक्यातील दुसाळे गावचे सुपुत्र सचिन संभाजी जाधव यांना वीरमरण आले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी कश्मीर येथून पुण्याकडे विमानाने नेण्याची प्रक्रिया सुरू होती. 19 रोजी सकाळी दुसाळे गावात पार्थिव पोहचेल तेथे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱयांनी दिली आहे. 

  पाटण तालुक्यातील दुसाळे गावातले हुतात्मा जवान सचिन जाधव हे बीईजी मध्ये 2003 मध्ये भरती झाले. त्यांनी आत्तापर्यंत देशसेवा पुणे, अरुणाचल प्रदेश, श्रीनगर, बरेली आणि लेह लडाख येथे केली. अवघे सहा महिने सेवा राहिली होती. त्यांचे वडील संभाजी जाधव हे मेजर सुभेदार पदावरून निवृत्त झाले आहेत, तर सध्या भाऊ ही देश सेवा बजावत आहे. त्यांची पत्नी आणि दोन मुले सातारा येथे असतात. काल रात्री त्यांच्या दुःखद निधनाची बातमी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजय पाटील यांनी नातेवाईकांना कळवताच दुःखाचा डोंगर कोसळला. सगळे दुसाळे गाव शोकसागरात बुडाले आहे. गावात हुतात्मा जवान सचिन जाधव यांच्या भावपूर्ण श्रद्धांजलीचे बॅनर लागले आहेत.   सचिन जाधव यांचे पार्थिव विशेष विमानाने दि. 18 सप्टेंबर 2020 रोजी संध्याकाळी 10.10 वाजता पुणे येथे पोहचणार आहे. त्यांच्या पार्थिवावर 19 सप्टेंबर 2020 रोजी त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी कळविले आहे. गावामधील धनगर वाटेवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गावातील ग्रामपंचायतीच्या वतीने शासकीय नियमानुसार पूर्वतयारी करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये स्टेज, रस्ता तसेच पार्थिवाचे स्वागत करण्याची जय्यत तयारी गावामध्ये सुरू आहे. 

Related Stories

प्रभाग 19 मध्ये नगरसेवक रवी ढोणे यांच्या माध्यमातून लसीकरण मोहिम

Amit Kulkarni

शाहूपुरीत ज्येष्ठ नागरिकांना घरी जावून लसीकरण

Patil_p

शहरातील इंदिरानगरमधील कंटेन्मेंट झोन उध्वस्त

Abhijeet Shinde

कोंढावळे व वासोळे येथील कातकरी समाजातील 50 कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

Patil_p

जुन्या भांडणातून सलून चालकांवर हल्ला

Patil_p

शिये – बावडा रोड वाहतुकीसाठी बंद

Abhijeet Shinde
error: Content is protected !!