तरुण भारत

प. बंगाल आणि केरळमध्ये एनआयएचे छापे; अल कायदाच्या 9 संशयित दहशतवाद्यांना अटक

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


राष्ट्रीय तपास यंत्रणेने शनिवारी सकाळी केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये छापे टाकत अल कायदाच्या 9 संशयित दहशतवाद्यांना अटक केेली आहे.  

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएने पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद आणि केरळच्या एर्णाकुलममध्ये रेड मारत ही कारवाई केली. एनआयएने सांगितले की, सर्व अटक केलेले संशयित हे दहशतवादी कृत्यांशी संबंधित आहेत.


सुरुवातीच्या चौकशीनुसार अटक केलेल्या सर्वजणांना सोशल मीडियावरुन पाकिस्तान स्थित अल-कायदाच्या दहशतवाद्यांच्या माध्यमातून द्वारा कट्टरपंथी बनवले होते. राजधानी दिल्लीसह देशातील काही ठिकाणी हल्ला करण्यासाठी त्यांना तयार केले जात आहेत. तसेच या प्रकरणात आणखी काही जणांना अटक केले जाऊ शकते, असेही एनआयएने म्हटले आहे. 


ही टोळी मोठ्या प्रमाणात पैसे लुटण्याचे धंदे करायची. यातील काही सदस्य हत्यारे आणि गोळाबारुदांच्या खरेदीसाठी दिल्लीला येण्याची योजना आखत होते, अशी माहिती आहे. देशातील विविध राज्यात अल-कायदाचे जाळे असल्याची माहिती मिळताच अशा भागात धाड टाकण्यात आली. यानंतर अल-कायदाच्या या 9 संशयितांना अटक करण्यात आली आहे.

Related Stories

येडियुरप्पा यांचे पंतप्रधानांना दरमहा १.५ कोटी लसीचे डोस देण्याचे आवाहन

Abhijeet Shinde

कोरोनावरील दोन नवीन लसी आणि एका गोळीला मंजूरी

Abhijeet Shinde

बिटकॉइन घोटाळ्यात काँग्रेसचे नेते सामील: सीएम बोम्माई

Sumit Tambekar

इंडिया, द ग्रेट !

tarunbharat

फ्रान्सकडून भारताला व्हेंटिलेटर, टेस्टिंग किटची मदत

datta jadhav

प्रलंबित जीएसटी भरपाई देण्याचे अर्थमंत्र्यांचे आश्वासन : मुख्यमंत्री बोम्माई

Abhijeet Shinde
error: Content is protected !!