तरुण भारत

पुलाची शिरोली-सांगली फाटा चौक सीसी टिव्हीच्या कक्षेत, गुन्हेगारीला बसणार आळा

पुलाची शिरोली / वार्ताहर

पुलाची शिरोली सांगली फाटा चौक सीसी टिव्हीच्या कक्षेत आला असुन या चौकात तीन सीसी टिव्ही कॅमेरे बसविण्यात आले. त्यामुळे अवैध धंदे व गुन्हेगारीला आळा बसणार आहे.
 
पुलाची शिरोली सांगली फाटा गुन्हेगारीचे ठिकाण म्हणून ओळखला जायचा.  गेल्या काही वर्षात या ठिकाणी खून, मारामारी, अवैध वाहतूक, लुटमारी, ट्रकचोरी, दरोडा घालण्याच्या उद्देशाने येणार्या टोळ्या, जुन्या नोटांची देवाण घेवाण, बनावट सोने व गांज्या विक्री यासारखे अनेक प्रकार घडले आहेत. त्यामुळे हा परिसर अतिसंवेदनशील बनला आहे.

पुलाची शिरोली सांगली फाटा हे पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्ग, कोल्हापूर सांगली, सोलापूर राज्यमार्गाला जोडलेले मुख्य ठिकाण आहे. या परिसरात ट्रान्सपोर्ट व्यवसाय,वाळु व्यवसाय, मार्बल मार्केट, पेट्रोल पंप, हाॅटेल्स, शिरोली एमआयडीसी, सिमेंट गोडावून, मद्याची गोडावून,चारचाकी किंमती गाड्यांचे शोरूम्स यासह बरेच व्यवसाय या ठिकाणी आहेत.त्यामुळे अनेक परप्रांतीय येथे कामानिमित्त ये जा करीत असतात. यातूनच अवैध धंदे चालत असतात .

सांगली फाटा येथे दिवसभर प्रवाशांची वर्दळ आणि वाहनांची मोठी रेलचेल सुरू असते. पण दिवस मावळला की या  परिसरात शुकशुकाट असतो. या चौकात एक ही दिपस्तंभ नव्हता ही मोठी खंत होती. अंधार पडला कि अनेक अवैध व्यवसाय करण्यासाठी सुरूवात होत होती. अंधाराचा फायदा घेऊन सांगली, पंढरपूर, सोलापूर, कराड, सातारा, पुणे याठिकाणी जाणार्या प्रवाशांना गाडीत घेऊन अज्ञात स्थळी घेऊन जाऊन लुटमारीचे अनेक प्रकार घडले आहेत. परराज्यातुन माल घेऊन येणारे ट्रक चालक रात्री जेवणासाठी ट्रक सांगली फाटा येथे लावून हाॅटेल धाब्यावर गेल्याचे पाहून अनेक ट्रक चोरीला गेले आहेत. येथे ट्रक चोरणारी टोळीच कार्यरत आहे. पण अद्याप ही टोळी सापडलेली नाही. सांगली फाटा येथे रात्री थांबलेल्या ट्रक मधील डिझेल चोरणारी ही टोळी आहे. या टोळीने एक दोन ट्रक चालकांचा जीव घेतला आहे. तर अनेकांना जखमी केले आहे.


याचा विचार करून तत्कालीन स. पो.नि. परशुराम कांबळे यांनी अनेक लोकांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास आवाहन केले होते. अखेर यासाठी शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनी अनेकांच्याकडे या चौकात हायमास्क हॅलोजन बल आणि सीसी टिव्ही बसवण्यासाठी आग्रही भूमिका घेतली. शेवटी शिरोली ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच शशिकांत खवरे यांनी हायमॅक्स हॅलोजन दिवे बसविले. तर हॉटेल उडपीच्यावतीने प्रकाश मुग्वेदा यांनी तीन सीसी टिव्ही कॅमेरे दिले. त्यामुळे शिरोली सांगली फाटा रात्रीच्यावेळी सुद्धा उजळून गेला असुन संपूर्ण परिसर सीसी टिव्हीच्या कक्षात आला आहे.

Advertisements

Related Stories

पुणे-बेंगळूर महामार्गावर शिरोलीपासून सातारला जाणारी एकेरी वाहतूक सुरु

Abhijeet Shinde

हिरवडे ग्रामपंचातील गैरव्यवहाराची चौकशी करा

Abhijeet Shinde

सहकारी साखर कारखान्यांच्या वार्षिक साधारण सभेस मुदतवाढ

Abhijeet Shinde

कोल्हापूर : कागलमध्ये कोरोनामुळे एकाच दिवशी बाप-लेकाचा मृत्यू

Abhijeet Shinde

पॉलिटेक्निक प्रवेशासाठी मुदत वाढली

Abhijeet Shinde

कोल्हापूर : गगनबावडा तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४६ वर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!