तरुण भारत

सर्वोत्कृष्ट प्राध्यापक पुरस्काराने बसवराज नरवाडे सन्मानित

वार्ताहर/मांजरी :

येथील बसवराज नरवाडे यांना बेंगळूर येथील विधानसौधमध्ये राज्यस्तरीय  सर्वोत्कृष्ट प्राध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बी. एस येडियुराप्पा व शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी शिक्षणतज्ञ दोरेस्वामी, विधान परिषद सदस्य हणमंत निराणी, अरुण शहापूर तसेच शिक्षण विभागाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisements

बसवराज नरवाडे हे जमखंडी तालुक्मयातील हुन्नूर येथील सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवा बजावत आहेत. सलग 10 वर्षे वाणिज्य शास्त्र व व्यवहार अध्ययन विषयात 100 टक्के निकाल दिला आहे. शिवाय इतर महाविद्यालयाचा निकाल वाढविण्यासाठी 10 ते 15 महाविद्यालयांमध्ये कार्यशाळा आयोजित करून विशेष प्रयत्न केले आहे. सामाजिक कार्यात हिरीरिने ते सहभागी होत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत पदवीपूर्व शिक्षण विभागाच्यावतीने राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट प्राध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबद्दल मांजरी परिसरातून बसवराज नरवाडे यांचे कौतुक होत आहे.

Related Stories

कै.रत्नाकर शेट्टी टी-20 क्रिकेट स्पर्धा फेब्रुवारीत

Patil_p

बेळगावसह काही जिल्हय़ात विकेंड कर्फ्यू मागे

Amit Kulkarni

दुसरे रेल्वेगेट अचानक कोसळले

Patil_p

रोट्रॅक्ट क्लब ऑफ वेणुग्रामचा अधिकारग्रहण समारंभ

Amit Kulkarni

आंबेवाडी येथे नवख्या चेहऱयांना संधी

Omkar B

सावधान…पुन्हा कोरोना वाढतोय

Omkar B
error: Content is protected !!