तरुण भारत

कांदा निर्यात रद्द करण्याची मागणी

प्रतिनिधी /सातारा :

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कांदा पिकाच्या दरात सातत्याने होत असलेली घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी मेटकुटीला आला आहे. त्यातच केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी लावल्याने शेतकरी हैराण झाला आहे. हा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा. या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी  जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर थाळी नाद आंदोलन केले. जिल्हाधिकाऱयांना  निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस युवक सेलचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, समिंद्रा जाधव, राजकुमार पाटील, स्मिता देशमुख, हणमंत जाधव, अशोकराव जाधव, नलिनी जाधव, पुजा काळे, श्वेताली मोहिते, रूपाली भिसे, प्रतिक्षा कदम व कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisements

       निवेदनात म्हटले की, हे सर्वसामान्य शेतकऱयांचे सरकार नाही. या एका निर्णयामुळे देशातील कांदा उत्पादक शेतकरी केंद्रातील मोदी सरकार ने दशोधडीला लावला आहे. दृष्काळ, गारपीट, टंचाई, रोगराई अशा कित्येक नैसर्गिक आव्हानांचा सामना शेतकऱयांना करावा लागत आहे. यातच शेतकऱयाने पोटच्या मुलांप्रमाणे सांभळलेले पीक शेतकऱयांना मातीमोल भावाने विकावे लागणार आहे.

एकरी सुमारे 70 हजार रूपये खर्च करून शेतात तयार झालेला कांदा चांगला दर मिळेल या आशेने एwरणीत 6 महिन्यापासून सडू लागला आहे. यामुळे कांदा लागवड करावी की नको याबाबत शेतकरी चिंतेत आहेत. खटाव तालुक्याचा उत्तर भाग तसेच कोरेगाव, माण तालुक्यातील शेकडो ट्रक कांदा सध्या एwरणीत पडून आहे. बदलत्या वातावरणामुळे कांद्याला कोंब येणे, पावसाचे पाणी शिरल्यामुळे कांदा नासत आहे. तसेच काजळी चढून रंग बदलत असल्याने एwरणीतच कांदा बाद होत आहे. कांद्याच्या दरात सातत्याने होणारी घसरण व केंद्र शासनाच्या निर्यात बंदीची धोरणे यामुळे शेतकरी वर्गातून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.

Related Stories

लोणंदमध्ये पेट्रोल पाईपालाईन फोडून चोरीचा प्रयत्न; सात अटकेत

Shankar_P

महिलेचा 50 हजारांचा सोन्याचा हार लंपास

Patil_p

वाहतूक शाखेचा कारभार गोंडसेंच्या खांद्यावर

Patil_p

सातारा : ‘छत्रपतींचे सेवक ग्रुप’कडून किल्ले अजिंक्यताऱ्याच्या राज महालाची स्वच्छता

triratna

भांडुप आग : दोषींवर कारवाई होणार : मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

pradnya p

राज्यसरकारने मराठा तरुण,तरुणींची झोप उडवली – चंद्रकांत पाटील

Shankar_P
error: Content is protected !!