तरुण भारत

दहशतवाद्यांकडून लपण्यासाठी बंकर्सचा आधार

सफरचंदाच्या घनदाट बागा, जंगल, नाल्यांचाही वापर : लष्कराने केला पर्दाफाश : शोपियानमध्ये सर्वाधिक प्रकार उघडकीस

वृत्तसंस्था/ शोपियान

Advertisements

काश्मीर खोऱयात सैन्य आणि सुरक्षा दलांच्या जाळय़ापासून बचाव करण्यासाठी उंचावरील ठिकाणी वा घरांमध्ये आसरा घेण्याची क्लृप्ती मागे पडून आता त्याची जागा घनदाट बागांमध्ये तसेच मोसमी नाल्यांमध्ये बंकर खोदून तिथे लपण्याने घेतली असल्याची दिसून येऊ लागले आहे.

पुलवामा आणि शोपियान या दोन जिह्यांत हा कल अलीकडच्या काळात दिसून आला आहे. खास करून शोपियानमध्ये हा प्रकार जास्त दिसून आला आहे. कारण तिथे सफरचंदाच्या दाट बागा आणि जंगल आहे, असे लष्कराचा दहशतवादविरोधी विभाग 44 राष्ट्रीय रायफल्सचे प्रमुख कर्नल ए. के. सिंग यांनी सांगितले. या पथकाने जास्तीत जास्त दहशतवाद्यांना ठार करण्याचा वा त्यांना आत्मसमर्पण करायला लावण्याचा तसेच पकडण्याचा मान मिळविलेला आहे. कर्नल सिंग आणि त्यांच्या चमूकडून हाताळले जाणारे शोपियांचे दोन भाग आणि पुलवामा जिह्यातील तीन भाग ही दहशतवाद्यांची मुख्य केंद्रे मानली जातात. भूमिगत बंकरांमध्ये दहशतवादी लपून बसतात असे दिसून आल्यानंतर त्यांच्यासमोरील आव्हान कठीण झाले आहे.

बंकरच्या युक्तीचा उलगडा

वरचेवर पुराचा फटका बसणाऱया रम्बी आरा परिसराच्या मध्यभागी अतिरेक्यांनी दडून बसण्याकरिता बंकरचा वापर चालविला होता. तो उघडकीस आल्यामुळे कर्नल सिंग आणि त्याच्या चमूला बंकरचा वापर करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. एका लोखंडी बंकरच्या आत दहशतवादी लपून बसले होते. सतर्क जवानांचा संशय सदर बंकरचे मुख म्हणून वापरल्या जाणाऱया तेलाच्या रिकाम्या बॅरेलने जागविला. दहशतवाद्यांकडून बंकरमध्ये जाण्यासाठी या बॅरलचा वापर करण्यात येत होता.

हा प्रकार संशयास्पद वाटल्याने पाळत ठेवण्यात आली. पाण्याचा प्रवाह जिथून वाहतो त्या भूमीखालून दहशतवादी बाहेर पडताना पाहून आम्हाला आश्चर्य दिसले. या नाल्यातून सर्वसाधारणपणे पावसाळय़ातच पाणी भरून वाहत असते, असे सिंग यांनी सांगितले. या वर्षाच्या सुरुवातीला सैन्याने हल्ला करून लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीनचे पाच दहशतवादी ठार केले होते. तथापि, ठार केलेल्या दहशतवाद्यांच्या संख्येपेक्षा ते भूमिगत बंकरमध्ये चांगल्या प्रकारे लपून बसले होते ही बाब सैन्यासाठी जास्त चिंता वाढविणारी ठरली.

त्यानंतर तांत्रिक उपकरणांच्या आणि मानवी संसाधनाच्या मदतीने, विशेषत: शोपियानच्या आसपासच्या भागांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले. त्यात भूमिगत बंकर तयार करून त्यात लपून बसण्याचे सत्र अतिरेक्यांनी चालविले असल्याच्या संशयाला पुष्टी मिळाली. बांदपोहमध्ये सफरचंदाच्या झाडांनी झाकलेल्या आणि उंचीवर वसलेल्या एका ठिकाणी भारतीय सैन्याला यावषी जून महिन्यात आणखी एक भूमिगत बंकर सापडला. दहशतवाद्यांनी तेथे 12 फूट खोल व 10 फूट रूंद बंकर तयार करण्यात यश मिळवले होते. भारतीय सैनिक नागरी भागात शोध घेत असताना सदर दहशतवादी तेथे आरामात राहिले होते. काहीच झाकून ठेवलेले नसतानाही टाकलेले पॉलिथीन शीट पाहिल्यावर आणि जवळपासची जमीन अलीकडेच भरून काढलेली असल्याचे स्पष्ट झाल्यावर जवानांचा संशय जागा झाला आणि त्यातून तिथे बंकर निर्माण केलेला असल्याचे उघड झाले.

Related Stories

कोरोनाची दुसरी लाट : RBI कडून आरोग्य क्षेत्राला 50 हजार कोटींची मदत

Rohan_P

फ्लिपकार्ट, वॉलमार्टची निंजाकार्टमध्ये गुंतवणूक

Patil_p

आसाम : करीमगंजमधील मतदान केंद्रावर पुन्हा मतदान

datta jadhav

पंजाब सरकारने महिला सशक्तीकरणाबाबत घेतला ‘हा’ ऐतिहासिक निर्णय

Rohan_P

सोनिया अन् राहुल गांधी यांना नोटीस

Patil_p

लडाखमध्ये होणार केंद्रीय विश्व विद्यालय : केंद्र सरकार

Rohan_P
error: Content is protected !!