तरुण भारत

गोव्यात 2022 मध्ये काँग्रेसचे राज्य यावे ही गोमंतकीयांची इच्छा

vगिरीश चोडणकर, भाजपला दोन अंकी आमदार निवडुन आणता येणार नाहीत

प्रतिनिधी/ मडगाव

सन 2022 च्या विधानसभा निवडणुकांत विजयी होऊन भाजपची असंवेदनशील व भ्रष्ट राजवट संपविण्यासाठी गोव्यातील जनता आज का??ग्रेस पक्षाकडे आत्मविश्वासाने पाहत असुन, का??ग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने लोकांच्या भावनांचा आदर राखुन, स्वत: कष्ट सोसुन जनतेचे त्रास कमी करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन गोवा प्रदेश का??ग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दक्षिण गोव्यातील का??ग्रेस गट अध्यक्षांच्या पहिल्या गटाच्या बैठकित बोलताना केले. 

  सदर बैठकीला का??ग्रेस विधीमंडळ गट नेते आमदार दिगंबर कामत, सरचिटणीस सुभाष फळदेसाई व प्रदीप नाईक तसेच दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष जोसेफ डायस उपस्थित होते.

  सन 2012 मध्ये लोकांची दिशाभूल करुन भाजपने सत्ता मिळवली व सन 2017 मध्ये अलोकशाही मार्गाने सत्ता काबीज केली. आज भाजप सरकार सर्व आघाडय़ांवर अयशस्वी ठरले असुन, गोवा राज्याला आर्थिक दिवाळखोरीत ढकलण्याचे काम भाजपने केले आहे. असंवेदनशील व लोक भावनांचा आदर न करणार्?या भाजपला 2022 च्या निवडणुकांत दोन अंकी आमदार निवडुन आणणे शक्मय होणार नाही असा आत्मविश्वास दिगंबर कामत यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

 भ्रष्टाचाराला लोकायुक्तांचे प्रशस्तीपत्र लाभलेले गोव्यातील भाजप सरकार हे एकमेव आहे असा टोला दिगंबर कामत यांनी हाणला.

   सरचिटणीस सुभाष फळदेसाई यांनी सर्व गट समितींचा आढावा या बैठकीत घेतला व गट अध्यक्षांना का??ग्रेसचे कार्यक्रम राबविण्यासाठी मार्गदर्शन केले. का??ग्रेसची सदस्यता मोहिम अधिक नेटाने पुढे नेण्याचे त्यानी सर्व गट अध्यक्षांना सांगितले.

  या बैठकीला पुष्कल सावंत (कुडचडे), आसिझ नोरोन्हा (कुंकळ्ळी), गोपाळ नाईक ( मडगाव), मान्य?एल कुलासो ( केपें), मान्य?एल डिकोस्ता (नूवें), प्रलय भगत ( काणकोण), रोयन वियेगस (वेळ्ळी), इमरान शेख (वास्को), महेश नाईक ( मार्मागोवा) हे गट अध्यक्ष उपस्थित होते.

Related Stories

राज्यातील भाजपचे सरकार दिशाहीन

Patil_p

बार्देशात लॉकडाऊनला 100 टक्के प्रतिसाद

Omkar B

मडगाव पालिका मुख्याधिकाऱयांच्या वाढदिन पार्टीत कोविड अटींचा फज्जा

Omkar B

विद्यार्थिनीचा मानसिक छळ करीत असल्याचा मुख्याध्यापिका, चेअरमन विरुद्ध तक्रार

Patil_p

सम्राट कपिलेश्वरीचा 27 रोजी अधिकारग्रहण सोहळा

Omkar B

राज्यातील अनेक हॉटेल, रेस्टॉरंट झाकण्यास सुरुवात

Omkar B
error: Content is protected !!