तरुण भारत

सोलापुरात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला सुरूवात

‘जिल्हा बंद’ला सर्वत्र प्रतिसाद
सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी पेटवले टायर

प्रतिनिधी / वैराग

Advertisements

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सोमवारी बार्शी, वैराग तालुक्‍यासह जिल्ह्यामध्ये बंदची हाक दिली आहे. जिल्ह्यातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची सुरूवातच पहाटे साडेपाचच्या सुमारास बार्शी तालुक्यातील तडवळे येथे बसस्थानकासमोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी टायर पेटवून केली. पहाटे सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी संजय आवारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले.

यावेळी “एक मराठा लाख मराठा” अशा घोषणा देण्यात आल्या. संजय आवारे यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन न्याय द्यावा, पोलिस भरती स्थगित करावी, शासनाने यामध्ये तातडीने लक्ष घालून आरक्षण द्यावे अशा मागण्या केल्या. यावेळी मेजर संजय आवारे, मा. सरपंच वर्षेकेतू जाधव, मा. चेअरमन रावसाहेब आवारे, सुनिल आवारे, अशोक जाधव, मिठू आवारे, मा. ग्रा. सदस्य संतोष जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

वैराग भागातील वैराग, तडवळे, ढोराळे, इर्ले, इर्लेवाडी, यावली, काळेगाव, मालेगाव, मानेगाव, घाणेगाव, नांदणी, उपळे दु, उंडेगाव, पानगाव, साकत, सारोळे, पिंपरी, मळेगाव, लाडोळे, मुंगशी(ख), जवळगाव, हत्तीज, धामणगाव, शेळगाव, राळेरास, दहीटणे, मुंगशी (वा), रांतजन, रूई, भालगाव, गैाडगाव, सुर्डी, मालवंडी, रस्तापूर, झरेगाव, कोरफळे, कव्हे या गावांनी बंदमध्ये सहभागी होत सर्व व्यवहार बंद ठेवले.

Related Stories

पवार थांबले… राजकारणाच्या नव्हे तर खुल्या आसमानाखालच्या लग्नाच्या मांडवात..!

Abhijeet Shinde

श्री विठ्ठलाचा प्रसाद घरपोच मिळण्यासाठी पंढरी प्रसाद वेबसाइटचे अनावरण

Abhijeet Shinde

सोलापूर शहरात २८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण, तिघांचा मृत्यू

Abhijeet Shinde

शेतकऱ्यांची बिले थकविणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करणार – जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde

सोलापूर : 1100 पैकी 994 जणांनी घेतली लस

Abhijeet Shinde

कोरेगाव-भीमा चौकशी आयोगासोर येण्यास मिलिंद एकबोटेंचा नकार

prashant_c
error: Content is protected !!