तरुण भारत

आयपीएलवरून चर्चेतले ते वादग्रस्त होर्डिंग उतरविले

प्रतिनिधी /म्हासुर्ली

परवा पासून आयपीएल २०२० हंगाम सुरू झाला आहे. आणि शहरा बरोबरच ग्रामीण भागातील गावोगावी या स्पर्धेतील स्टार खेळाडू व टीम जणू वाटून घेण्याची स्पर्धाच चाहत्यांच्या वाढल्याचे चित्र आहे. परिणामी नव्हे तितके गावांगावातील तरुणांच्या फॅन्समध्ये कमालीचे आयपीएलची हवा गरम झाल्याची स्थिती आहे. आणि यातून गट – तट निर्माण झाले.

अशीच स्थिती कोल्हापूर जिल्ह्यात पाहावयास मिळत असून शहरात तर आयपीएल स्पर्धा सुरू होण्या आधीच तरुणांचे दोन गट एकमेका विरुध भिडले होतेच. पण शहराबरोबरच ग्रामीण भागातील तरुणांच्यासह जेष्ठामध्ये आपीएल ज्वर चांगलाच भरल्याचे दिसून येत असून परवा आयपीएल सुरू झाल्यावर देखील ग्रामीण भागात पण ईर्षा काय असते यांचा प्रत्यय राधेची नगरी म्हणून प्रसिध्द असलेल्या गावात पाहण्यास मिळत होता. मात्र सर्वत्र चर्चेचा विषय होत असल्याने व परस्थितीचे गार्भिय ओळखत गावात मित्र म्हणून एकत्र असलेल्या दोन्ही टीम समर्थकांनी सदर होर्डिंग फलक रविवारी रात्री काढले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील सदर गाव हे पर्यटन व शाहू कालीन धरणामुळे जगाच्या नकाशावर पोहचले असून गावाच्या मध्यवर्ती बाजारपेठ चौकात आयपीएलवरून समर्थकांनी दोन होर्डिंग्ज लावले होते. त्यामुळे बाहेरून गावात येणाऱ्या सर्वांच्या नजरा इकडे वळत होत्या. त्यामुळे सदर होर्डिंगची सर्वत्र चर्चा होत होती. संबंधित होर्डिंग्जकडे प्रथमदर्शी पाहिल्यावर आणि त्यावरील मजकूर वाचल्यावर दोन टीम समर्थकांतील किती टोकाची ईर्षा असल्याचे नजरेत भरत होते. मुंबई इंडियन्स समर्थकांनी लावलेल्या होर्डिंग्ज फलका जवळच अगदी त्याच्या बाजूला चेन्नई सुपर किंगच्या टीम समर्थकांनी होर्डिंग्ज फलक लावला होता. त्यामुळ तालुक्यात सर्वत्र चर्चेचा विषय बनला होता. दोन्ही होर्डिंग्ज फलकावर महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा या दोन स्टार क्रिकेटवीरांच्या फोटो छब्या झळकविण्यात आल्या होत्या

यामध्ये मुंबई इंडियन्स समर्थकांच्या फलकावर ‘जल मत बराबरी कर’. तसेच ‘नावातच दहशत’ त्याच बरोबर ‘आण्णा म्हणत्यात, सलाम ठोकत्यात’ असा मजकूर ठळकमध्ये छापला होता. तर चेन्नई सुपर किंग्ज समर्थकांच्या पोस्टरवर ‘धोनी साहेब’ आणि ‘आण्णा गेले बंबात’ असा मजुकर छापण्यात आला होता. त्यामुळे गावात येणाऱ्या जाणाऱ्याचे लक्ष वेधत होते. त्यामुळे शहरासारखे या गावात गंभीर प्रकरण तर होणार नाही ना अशी चर्चा सर्वत्र होत होती. तर दोन्ही फलकांच्या मजकूरांवरुन सदर टीम समर्थकांमधील कमालीची ईर्ष्या असल्याचे वाटायचे. पण या होर्डिंग वरून सर्वत्र वाईट मेसेज जाऊन वातावरण गढूळ बनू शकते हे लक्षात आल्यावर सदैव एकत्र मित्र असणारे पण आयपीएलच्या संदर्भातून दोन टिमचे समर्थक बनलेल्या समर्थकांनी रविवारात्री समयसूचकता दाखवत सदर फलक उतरुन उलटसुलट होणाऱ्या चर्चेला पूर्ण विराम दिला आहे.

Related Stories

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीसाठी तुर्केवाडीचा आठवडी बाजार बंद

triratna

कोल्हापूर : अतिवृष्टीने 55 हजार शेतकऱ्यांना फटका

Shankar_P

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा प्रयत्न

triratna

कोल्हापूर : लस उत्सवात विक्रमी लसीकरण

triratna

हुपरीत जैन मंदिर जीर्णोद्धारात आढळल्या ९०० वर्षांपूर्वीच्या प्राचीन प्रतिमा

triratna

`गोकुळ’ च्या लढाईत जि.प.सदस्यांची उडी

triratna
error: Content is protected !!