तरुण भारत

माधवनगर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास मारहाण

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

प्रतिनिधी / माधव नगर

अहिल्यानगर येथे पाणी न सोडण्याच्या कारणावरून ग्रामपंचायत मधील पाणी कर्मचाऱ्यास रविवारी सायंकाळी माधव नगर नाका येथे मारहाण दत्तात्रय उर्फ लिंगा हत्तीकर वय 25 असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. अहिल्यानगर नगर येथे गेली दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा असल्याने तेथील रहिवासी राहुल नागेश कांबळे वय 23 व त्यांच्या साथीदारांनी हत्तीकर या पाणी कर्मचाऱ्यास बेदम मारहाण करून लोखंडी पाण्याने डोक्यात घाव घातले त्यामुळे डोक्यात 22 टाके पडले आहेत.

अशी माहिती ग्रामपंचायत व जखमी कर्मचाऱ्यांचे नातेवाइकांकडून मिळाली असून त्याच्यावर सांगली वसंतदादा शासकीय रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. तत्काळ त्या आरोपीवर कारवाई करावी असे निवेदन माधवनगर येथील राजकुमार घाडगे, महेश साळुंखे, शोभा ताई चव्हाण व ऋतुजा दत्तात्रय हत्तीकर, राधिका गणेश जावीर तसेच ग्रामपंचायत मधील कर्मचाऱ्यांनी सरपंच अनिल पाटील उपसरंपच देवराज बागल यांना निवेदन देऊन कामबंद आंदोलन केले

Related Stories

निर्बंध कडक… तरीही शहरात गर्दी कायम

Abhijeet Shinde

पुणे पदवीधर आणि शिक्षक निवडणूकीसाठी शिराळा तालुक्यात ११ केंद्रावर व्यवस्था

Abhijeet Shinde

दुधगाव बंधाऱ्यावरून सांगली कोल्हापूर खुलेआम वाहतूक, वाहनचालकांची पोलिसांना अरेरावी

Abhijeet Shinde

शस्त्रक्रियेसाठी पालकमंत्री जयंत पाटील यांचा पुढाकार

Abhijeet Shinde

सांगली : आष्ट्यात उसाच्या फडाला आग, एका शेतकऱ्यासह दोन शेळ्यांचा होरपळून मृत्यू

Abhijeet Shinde

सांगली : कर्जाला कंटाळून द्राक्षबागायतदार शेतकऱ्याची आत्महत्या

Sumit Tambekar
error: Content is protected !!