तरुण भारत

गुगल पे, कार्ड आधारीत पेमेंटसाठी व्हिसाशी भागीदारी

वृत्तसंस्था / नवी दिल्ली 

गुगल पे कडून सोमवारी आपल्या प्लॅटफार्मवरुन टोकनीकरण लागू करण्याची घोषणा करण्यात आली. ज्याच्या मदतीने आपल्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून देवाण-घेवाणीचे आर्थिक व्यवहार ग्राहकांना सुरक्षितपणे करता येणार असल्याचेही म्हटले आहे.

Advertisements

टोकनायझेशद्वारे गुगल पे अँड्राईड वापरकर्ते थेट त्यांचे कार्ड स्वॅप न करता डेबिट किंवा पेडिट कार्ड वापरु शकतील. त्याअंतर्गत कार्डशी संबंधीत मोबाईल नंबरवर पाठविलेल्या सुरक्षित डिजिटल टोकनद्वारे पेमेंट केले जाईल. यावर कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे, की व्हीसा आणि बँकिंग भागीदारांसह ही सुविधा आता ऍक्सिस आणि स्टेट बँक कार्ड वापरणाऱयांसाठी उपलब्ध आहे. तर येत्या काळात कोटक आणि इतर बँकांसह ही सुविधा लवकरच सुरु केली जाण्याची शक्मयता असल्याचे स्पष्ट केले आहे.

टोकन देयकासह, गुगल पे ग्राहकांना एनएफसी सक्षम अँड्राईड डिव्हाइस किंवा फोन वापरुन सुरक्षित पेमेंट करता येणार आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे सुविधेसह 25 लाखाहून अधिक व्यापाऱयाच्या ठिकाणी संपर्कहीन पेमेंट केले जाऊ शकते. तसेच 1.5 दशलक्षहून अधिक इंडिया क्मयूआर स्कॅन करुन पैसे भरता येतील. गुगल पे व्यवसाय विभागाचे प्रमुख साजिथ शिवानंदन म्हणाले की, आम्ही ग्राहकांना सुरक्षित पेमेंट करण्याची सुविधा देण्यास कटिबद्ध राहणार असल्याचेही म्हटले आहे.

Related Stories

एसबीआयने वाढवले व्याजदर

Patil_p

स्पाईस एक्स्प्रेसची ड्रोनने डिलिव्हरी

Amit Kulkarni

‘एसबीआय कार्ड्स’ लिस्टिंगवर कोरोनाची छाया

tarunbharat

विमा कंपन्यांकडून मिळणार कॅशलेस उपचार सुविधा

Patil_p

दुसऱया दिवशी सेन्सेक्स 288 अंकांनी तेजीत

Patil_p

जपानची निर्यात 19.2 टक्क्यांनी प्रभावीत

Patil_p
error: Content is protected !!