तरुण भारत

सांगली : आटपाडी अतिवृष्टी दुर्लक्षाने अधिकारी धारेवर

आटपाडी / प्रतिनिधी

आटपाडी तालुक्यात अतिवृष्टी होऊन रस्ते, पुल, पाझर तलाव, को.प.बंधारे यांचे मोठे नूकसान झाले आहे. तरीही अधिकारी फिरकले नाहीत. त्यामुळे जबाबदारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिका-यांना आमदार अनिलभाऊ बाबर यांनी चांगलेच धारेवर धरले. चार दिवस उलटुनही नूकसानीचा अहवाल तयार न करणाऱ्या अधिका-यांची झाडाझडती घेत आमदार अनिलभाऊ बाबर यांनी कर्तव्याची जाणीव करून दिली.

आटपाडी तालुक्यात शुक्रवारी अतिवृष्टी झाली. आटपाडी शहरासह तालुक्यात सर्वत्र पुल, वाहून जाणे, रस्ते खचणे, बंधाऱ्याचे नुकसान होणे, नाला बांध वाहून जाणे. शेतक-यांच्या शेतीपिकांचे नूकसान होणे, घरांची पडझड होणे असे प्रकार घडले. कोट्यावधींचा फटका बसुन सर्वत्र नुकसान झालेले असताना वरिष्ठ आणि स्थानिक अधिका-यांनी ही वस्तुस्थिती पाहण्याकडे पुर्णतः दुर्लक्ष केले.

आमदार अनिल बाबर यांनी नूकतेच कोरोनावर मात केली आहे. त्यांना डॉक्टरांनी विश्रांती घेण्यास सांगितले आहे. अशा ही स्थितीत आमदार बाबर यांनी आटपाडी तालुक्यातील नुकसानीची माहिती घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषद बांधकामचे अधिकारी मिसाळ, छोटे बांधकामचे अधिकारी फरास यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधुन त्यांनी केलेल्या दुर्लक्षाबद्दल फैलावर घेतले.

चार दिवस झाले तरी नुकसानिकडे लक्ष दिले नाही. लोकांना अडचणी असताना आधिकाऱ्यानी केलेले दुर्लक्ष संतापजनक आहे. रस्ते, पुल, पाझर तलाव, नालाबांधाचे गुकसान झाले आहे. शेतक-यांच्या पिकात पाणी आहे. अनेकांची घरे पडली आहेत. अशावेळी झालेल्या नुकसानीचा अहवाल सादर करून त्याच्या उपाययोजना करणे, दुरुस्ती करण्याची गरज असताना तुम्ही काय करत आहात ? असा सवाल करत आमदार अनिल बाबर यांनी संताप व्यक्त केला.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनाही आतिवृष्टीकडील दुर्लक्षाबद्दल आमदार बाबर यांनी जाब विचारला. आटपाडी तालुक्यातील नुकसानीकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. हा प्रकार संतापजनक असल्याचे सांगत आमदार अनिल बाबर यांनी आटपाडी तालुक्यातील रस्ते, पुल, बंधारे यासह लोकांची घरे पाण्यात गेली असतानाही त्याकडे पाहण्यास वेळ नाही काय ? असा सवाल करत तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार अनिलराव बाबर यांनी सीईओंना केल्या.

प्रसंगी कोरोना मुक्तीनंतर होम क्वारंटाइनचा पहिला दिवस असलेतरी मी येतो. माझ्या गाडीत चला. लोकांचे प्रश्न समजून घ्या, असेही आमदार अनिल बाबर यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

Related Stories

पाडळी सोसायटीचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात

Abhijeet Shinde

म.फुले आरोग्य योजनेंतर्गत मोफत सेवा मिळणे आवश्यक – ना.टोपे

Abhijeet Shinde

सांगली : म्हैसाळ योजनेचे आवर्तन तात्काळ सुरू करा

Abhijeet Shinde

सांगली जिल्हय़ात 272 मुक्त तर नवे 131 रूग्ण

Abhijeet Shinde

कसबे डिग्रज पूरग्रस्त मदतीच्या गैरकारभाराची चौकशी ?

Abhijeet Shinde

सांगली : महापालिका अधिकाऱ्यांना फिरवले ड्रेनेज पाण्यात

Abhijeet Shinde
error: Content is protected !!