तरुण भारत

पेमेंट कंपनी पेटीएमकडून गुगलवर आरोप

नियमावलीसह अन्य बाबींचा समावेश : दोन्हींकडून आरोपप्रत्यारोप

वृत्तसंस्था / नवी दिल्ली 

डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमकडून गुगलवर मोठय़ा प्रमाणात आरोप करण्यात आले आहेत. रविवारी कंपनीने आपल्या एका ब्लॉग पोस्टमध्ये, गुगल भारताच्या डिजिटल इकोसिस्टमवर वरचढ होणार असल्याचे म्हटले होते. कंपनीने भारतात कायदेशीर कारभार सुरु होण्याच्या दरम्यान गुगलने त्याला कॅशबॅकची सवलत काढून टाकण्यासाठी मजबूर केले होते. तेंव्हा गुगलची पेमेंट सर्व्हिस फिचर गुगल पे स्वतःच ही सवलत देत होती.

पेटीएमकडून भारतामध्ये दोन्ही म्हणजे कॅशबॅक व स्क्रॅच कार्डमार्फत सवलत देताना कायदेशीर आणि सरकारचे सर्व नियम व कायद्याचे पालन करूनच सुविधा दिली जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पेटीएमने म्हटले आहे, की गुगलच्या जवळ अँड्राईड आहे, जे एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. यावर भारतामध्ये 95 टक्केपेक्षा अधिक स्मार्टफोन्स चालतात. यावरुन गुगल ऍप प्ले स्टोअरच्या पॉलिसीमध्ये भेदभाव करणारी असल्याचे म्हटले आहे.

पेटीएमचा आरोप

पेटीएमने म्हटले आहे, की पहिल्यांदाच गुगलने युपीआय कॅशबॅक आणि स्क्रॅचकार्ड कँपेनसह संबंधीत नोटिफिकेशन पाठवून दिल्या होत्या आणि आम्ही या संदर्भात आमची भूमिका मांडण्याची संधी दिली नक्हती. तसेच गुगलनेही भारतामधील याप्रकारे ऑफर कँपेन चालवत असल्याचे म्हटले आहे.

गुगलचे स्पष्टीकरण

दुसऱया बाजूला गुगलने पेटीएमला बॅन केल्यानंतर म्हटले आहे, की प्ले स्टोअर फँटेसी क्रिकेट, ऑनलाईन कसीनो आणि दुसरीकडे गॅम्बलिंग ऍप्सना भारतामध्ये परवानगी देता येत नाही. परंतु असे कोणी केले तर हे धोरणाचे उल्लंघन असून यासंदर्भात कारवाई केली जाते. त्यामुळेच आम्ही पेटीएमवर कारवाई केल्याचे स्पष्ट केले आहे.

Related Stories

लॉकडाऊनमुळे ईपीएफमधून 75 टक्के रक्कम काढता येणार

tarunbharat

रियलमी 7 5जी स्मार्टफोन लाँच

Omkar B

पुढील वर्षी 20 लाख वायफाय हॉटस्पॉटस्

Omkar B

आजपासून दैनंदिन जीवनातील व्यवहारांमध्ये 10 नियम बदलणार

Omkar B

डिजिटल व्यवहारात सहापट वाढ :आरबीआय

Omkar B

गुगलच्या नव्या ऍपने विना इंटरनेट जोडता येणार विविध उपकरणे

Patil_p
error: Content is protected !!