तरुण भारत

इपीएफओकडे जुलैमध्ये 8.45 लाख नवीन नावनोंदणी

देशामध्ये उद्योग व्यवसाय सुरु झाल्याचा परिणाम

वृत्तसंस्था /नवी दिल्ली 

Advertisements

देशामध्ये मे महिन्यापासून केंद्र सरकारकडून अनलॉकची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे देशातील बहूतांश उद्योग, व्यवसायांना चालना मिळत असल्याचे पहावयास मिळाले आहे. याचाच एक भाग म्हणून जुलै 2020 मध्ये एकूण 8.45 लाख नवीन एनरोलमेंट(नावनोंदणी) करण्यात आले आहेत, अशी माहिती कर्मचारी भविष्य निधी संघटना(ईपीएफओ) यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.

यासोबतच ईपीएफओने जूनचा पे रोल सुधारीत डाटा सादर केला आहे. जुलैमध्ये प्राप्त झालेल्या माहितीमधून जूनमध्ये 6.55 लाख नवीन एनरोलमेंट झाले आहे. आता ईपीएफओने माहिती सादर करताना म्हटले आहे, की जून 2020 मध्ये 4.82 लाख नवीन एनरोलमेंट करण्यात आले आहेत. तसेच ईपीएफओने एप्रिल आणि मे महिन्यातील माहिती सुधारली आहे.

वित्त वर्ष 2019-20 मध्ये प्रत्येक महिन्यांच्या टप्प्यावर 7 लाख नवीन एनरोलमेंट होत होते. ईपीएफओच्या तुलनेत मागील वित्त वर्षात एकूण नवीन एनरोलमेंटची संख्या 78.58 लाख राहिली होती. तसेच या अगोदरच्या वित्त वर्षात  2018-19 मध्ये एकूण 61.12 लाख नवीन रोजगारांची प्राप्तीची नोंद करण्यात आली होती. ईपीएफओकडून सर्वात प्रथम एनरोलमेंटचा डाटा एप्रिल 2018 मध्ये सादर केला होता.

Related Stories

इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणी शुल्कात सवलत

Patil_p

ई-कॉमर्स बाजाराला उज्ज्वल भविष्य

Patil_p

चालू आर्थिक वर्षात मुख्य सात क्षेत्रांवर कोरोनाची छाया

Patil_p

मार्चमध्ये एमजी मोटारची विक्री हजारात

Patil_p

मागच्यावर्षी सोने मागणी 35 टक्क्यांनी घटली

Patil_p

नवीन लेबर कोड एप्रिलपासून लागू होणार ?

Amit Kulkarni
error: Content is protected !!