तरुण भारत

वनप्लस 8 टी स्मार्टफोन 14 ऑक्टोबरला

बिजिंग

 स्मार्टफोन क्षेत्रात नाव कमावलेल्या वनप्लसचा नवा 8 टी हा फोन ऑक्टोबर 14 तारखेला बाजारात लांच केला जाणार आहे. म्हणजे तशी तयारी तरी सध्या कंपनीने केली असल्याचे समजते. हा फोन ऑक्सीजन ओएस व अँड्रॉईड 11 यावर आधारीत असणार आहे. वनप्लस खरं तर टी सिरीजमधील आपले फोन्स सप्टेंबरमध्ये बाजारात दाखल करते. पण सध्याला कोरोना महामारीमुळे या फोनच्या लांचिंगला उशीर झाला आहे. 8 टी हा नवा फोन आता जुन्या वनप्लस 7 टीची जागा घेईल. यापूर्वी 7 टी हा फोन 2019 मध्ये भारतात सप्टेंबरमध्ये बाजारात कंपनीकडून उपलब्ध झाला होता. नव्या फोनचा स्क्रीन 6.5 इंचाचा असणार असून या फोनला पाठीमागे 4 कॅमेरे असतील असं सांगितलं जातंय.

Advertisements

Related Stories

‘लावा’ भारतात करणार 800 कोटींची गुंतवणूक

datta jadhav

2021 मध्ये सॅमसंगचे 3 फोल्डेबल स्मार्टफोन्स

Patil_p

आयफोन-12 लवकरच वितरकांकडे उपलब्ध

Patil_p

आयफोन 13 ला नाही होणार उशीर

Omkar B

फेक न्यूजच्या प्रतिबंधासाठी…

Omkar B

जूनमध्ये गुगलचा स्मार्टफोन

Patil_p
error: Content is protected !!