तरुण भारत

जागतिक विक्रीमुळे सेन्सेक्स कोसळला

सेन्सेक्स 812 अंकांनी घसरला : निफ्टी 11,300 च्या खाली

वृत्तसंस्था / मुंबई

Advertisements

जागतिक पातळीवरील विक्रीच्या प्रभावामुळे देशातील शेअर बाजार चालू आठवडय़ातील पहिल्या दिवशी जवळपास 811.68 अंकांनी कोसळला आहे. दिवसभरातील कामगिरीत रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि भारती एअरटेलमध्ये मोठय़ा प्रमाणात घसरण राहिल्याचे पहावयास मिळाले.

प्रमुख कंपन्यांच्या जोरावर बीएसई सेन्सेक्स सोमवारी अंतिम क्षणी 811.68 अंकांनी घसरुन निर्देशांक 38,034.14 वर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 254.40 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 11,250.55 वर बंद झाला आहे.

सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँकेचे समभाग सर्वाधिक 8 टक्क्मयांनी घसरले आहेत. तसेच सोबत भारती एअरटेल, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, मारुती सुझुकी, ऍक्सिस बँक आणि ओएनजीसीच्या समभागांचा समावेश राहिला आहे. दुसऱया बाजूला कोटक बँक, इन्फोसिस आणि टीसीएस या कंपन्या लाभात राहिल्या आहेत.

युरोपमध्ये कोविड 19 चे प्रमाण वाढल्याच्या कारणामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच यामुळे जगभरातील प्रमुख शेअर बाजारात अचानकपणे विक्रीचा प्रभाव वाढल्याने त्याचे पडसाद देशातील शेअर बाजारात राहिल्यानेच सेन्सेक्स तब्बल 800 पेक्षा अधिक अंकांनी कोसळला असल्याची नोंद केली आहे.

जागतिक पातळीवर आशियातील अन्य बाजारात शांघाय, हाँगकाँग आणि दक्षिण कोरियातील सोलमध्ये विक्रमी घसरण नोंदवली आहे. तसेच युरोपातील बाजारात प्रारंभीच्या काळात विक्री राहिल्याने तीन टक्क्मयांची घसरण राहिली आहे.या घडामोडींच्या दरम्यान जागतिक तेल मानक ब्रेंट क्रूड 2.04 टक्क्मयांनी घसरुन 42.27 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले होते. तर विदेशी विनिमय बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 7 पैशांनी मजबूत होत 73.38 वर बंद झाला आहे.

Related Stories

मॅप माय इंडियाचा येणार आयपीओ

Patil_p

मोटोरोला 3 स्मार्टवॉच सादर करणार

Patil_p

देशाची निर्यात 0.67 टक्क्यांनी वाढली

Patil_p

धनत्रयोदशीला 40 टन सोने विक्री

Patil_p

‘ऍपल’चे बाजारमूल्य 3 ट्रिलियन डॉलरसमीप

Amit Kulkarni

5-जी कनेक्शन 35 कोटीवर पोहोचणार

Patil_p
error: Content is protected !!