तरुण भारत

पंचांच्या ‘त्या’ निर्णयाचा पंजाबला फटका

आयसीसी इलाईट पॅनेलचे नवे सदस्य, पंच नितीन मेनन यांच्या पंचगिरीतील हाराकिरीचा किंग्स इलेव्हन पंजाबला मोठा फटका बसला. रबाडाच्या निर्धारित लढतीतील 19 व्या षटकात जॉर्डनने दुहेरी धावा घेतल्या, त्यावेळी स्क्वेअर लेग पंच नितीन मेनन यांनी ‘शॉर्ट रन’ची खूण केली. पण, रिप्लेत त्याने धाव पूर्ण केली असल्याचे दिसून आले. जर ती धाव दिली गेली असती तर 20 षटकांच्या निर्धारित लढतीत पंजाबला एका धावेने विजय संपादन करता येणे शक्य झाले असते.

पंजाब व दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील ही लढत सुपरओव्हरपर्यंत रंगली. पण, पंचांची ती चूक झाली नसती तर हा सामना निर्धारित षटकातच निकाली होऊ शकला असता.

Advertisements

रिप्लेमध्ये जॉर्डनने पहिली धाव पूर्ण केली असल्याचे दिसून आले होते. तरीही पंचानी शॉर्ट रनची खूण केल्याने सर्वांसाठी हा आश्चर्याचा धक्का बसला. पंचांनी तो शॉर्ट रन ठरवल्यानंतर मयांकच्या खात्यात केवळ एकच धाव जमा झाली.

पुढे या लढतीतील शेवटच्या षटकात विजयासाठी 13 धावांची गरज असताना अगरवालने पहिल्या 3 चेंडूत 12 धावा वसूल केल्या. पण, पुढील तीन चेंडूत त्यांना 2 धावा जमवता आल्या नाहीत आणि ही लढत टाय झाली. पुढे सुपरओव्हर सुरु होण्यापूर्वीच नितीन मेनन यांचा शॉर्ट रनचा निर्णय चुकीचा असल्याचे रिप्लेत स्पष्ट झाले. या हंगामातील आयपीएल स्पर्धेच्या दुसऱयाच लढतीत पंचांकडून अशी मोठी चूक होणे आयोजकांसाठीही चिंतेचे ठरले तर त्यात आश्चर्याचे कारण नसेल.

Related Stories

विद्यमान विजेत्या विंडीजचा 55 धावात धुव्वा!

Patil_p

वानखेडेतील तीन ब्लॉक्सना दिलीप वेंगसरकर यांचे नाव

Patil_p

विंडीजच्या विजयात सिमन्सची चमक

Patil_p

ऍथलीट्ससाठी बॅटरीच्या मास्कची चांचणी लवकरच

Patil_p

धवनच्या फटकेबाजीमुळे दिल्ली ‘गब्बर’!

Patil_p

पीव्ही सिंधू अंतिम फेरीत

Patil_p
error: Content is protected !!