तरुण भारत

कार्लसन, सो संयुक्त विजेते

हरिकृष्णला संयुक्त सातवे स्थान

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisements

ब्लिट्झ 2 मध्ये निष्प्रभ प्रदर्शन केल्यामुळे भारताचा ग्रँडमास्टर पी. हरिकृष्णला सेंट लुईस रॅपिड-ब्लिट्झ ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत संयुक्त सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. जागतिक अग्रमानांकित मॅग्नस कार्लसन व अमेरिकेचा वेस्ली सो यांनी या स्पर्धेत संयुक्त विजेतेपद पटकावले.

हरिकृष्णला ब्लिट्झ 2 मधील नऊ फेऱयांत केवळ एक विजय मिळविता आला. त्याने फक्त 3 गुण मिळविले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या दहा खेळाडूंत सर्वात कमी रेटिंग असलेल्या अमेरिकेच्या जेफ्री झिआँगवर त्याने हा एकमेव विजय मिळविला. नऊ फेऱयात त्याला चार पराभव स्वीकारावे लागले तर तीन डाव अनिर्णीत राखले. झिआँगसमवेत त्याला संयुक्त सातवे स्थान मिळाले. ब्लिट्झ 1 विभागात हरिकृष्णने कार्लसनवर सनसनाटी विजय मिळविला होता. मात्र दुसऱया टप्प्यात त्याला कार्लसनकडून 47 चालीत पराभव स्वीकारावा लागला.

कार्लसनने दुसऱया टप्प्यात पराभवाने सुरुवात केली. मात्र त्याने 3 विजय, 5 ड्रॉसह एकंदर 24 गुण घेत सोसमवेत पहिले स्थान मिळविले. दोघांना प्रत्येकी 45,000 डॉलर्स देण्यात आले. नाकामुराने 21 गुणांस तिसरे, ऍरोनियन व ग्रिस्चुक यांनी 18.5 गुणांसह चौथे, नेपोमनियाचीने 18 गुणांसह सहावे, झिआँग व हरिकृष्ण यांनी 15.5 गुणांसह सातवे, अलिरेझा फिरौजा व डॉमिनिगेझ यांनी 12.5 गुणांसह नववे स्थान मिळविले.

Related Stories

स्वित्झर्लंड 67 वर्षांनंतर प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत!

Patil_p

भारत-लंका पहिला टी-20 सामना आज

Patil_p

रूमानियाच्या हॅलेपची विजयी सलामी

Patil_p

भारतीय तिरंदाजांना सुवर्णपदकाची पुन्हा हुलकावणी

Patil_p

बिशनसिंग बेदी यांच्यावर शस्त्रक्रिया

Patil_p

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन

Omkar B
error: Content is protected !!