तरुण भारत

गणित विषयाच्या पेपरला 269 विद्यार्थ्यांनी मारली दांडी

प्रतिनिधी/ बेळगाव

दहावीच्या पुरवणी परीक्षेला सोमवारपासून प्रारंभ झाला. सॅनिटायझर्सचा वापर, मास्कचे वितरण, सामाजिक अंतर अशा अचूक व्यवस्थेत गणितचा पहिला पेपर पार पडला. 7 हजार 297 विद्यार्थी परीक्षेला हजर होते तर 269 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. कोरोनाचे संकट गडद झाले असतानाच दहावीची परीक्षा झाली होती. परिणामी परीक्षेला तारीख पे तारीख देण्यात येत होती. यामुळे परीक्षा होणार की नाही, अशा मानसिकतेत विद्यार्थी होते. यामुळे यंदाच्या पुरवणी परीक्षेला विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.

Advertisements

कोविड-19 मुळे बिघडलेल्या शैक्षणिक वर्षाच्या वेळापत्रकामुळे जूनमध्ये होणारी पुरवणी परीक्षा सप्टेंबर महिन्यात घेण्यात येत आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात एकूण 38 केंद्रांवर पुरवणी परीक्षा घेण्यात येत आहे. 11 हजार 557 विद्यार्थी पुरवणी परीक्षा देणार आहेत. त्यापैकी 59 विद्यार्थी प्रेशर्स म्हणून परीक्षा देत आहेत. गणित विषयाच्या पेपरला अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 7 हजार 566 इतकी होती. मात्र सदर पेपरला एकूण 269 विद्यार्थ्यांनी दांडी मारली.

परीक्षेवेळी प्रामुख्याने कॉपीसारख्या प्रकारांना आळा घालण्याच्यादृष्टीने विद्यार्थ्यांची तपासणी केली जाते. मात्र सध्याच्या स्थितीत कोरोनाचा संसर्ग वाढत असताना विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी  केंद्रात प्रवेश करताच सॅनिटायझर्स, मास्कचे वितरण करून आरोग्य तपासणी करण्यात आली. ताप, सर्दी असलेल्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करून देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचे आव्हान स्वीकारत केंद्रांवर अचूक व्यवस्थेत परीक्षेला सुरुवात झाली. मंगळवार दि. 22 रोजी प्रथम भाषा विषयाचा दुसरा पेपर पार पडणार आहे.

गणित विषय नावडीचा

दहावी परीक्षा उत्तीर्ण होणे पुढील शैक्षणिक आणि करिअरच्या वाटचालीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे ठरते. यामुळे दहावी पास हो, अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. मात्र नावडीच्या वाटणाऱया गणित विषयात अनुत्तीर्ण होण्यामध्ये मुलांची संख्या अधिक आहे. गणित विषयाच्या पुनर्परीक्षेसाठी 5 हजार 68 विद्यार्थ्यांनी (मुलांनी) पुरवणी परीक्षेला अर्ज केला होता. मुलींच्या तुलनेत मुलांचे अनुत्तीर्णांचे प्रमाणे दुप्पट असल्याचे दिसून येत आहे. परीक्षेला त्यापैकी 4 हजार 925 विद्यार्थी (मुले) हजर होते. तर विद्यार्थिनींची संख्या पाहिली असता केवळ 2 हजार 372 मुलींनी पुरवणी परीक्षा दिली.

Related Stories

बालकांना अंगणवाडीत लसीकरण

Patil_p

बेळगाव-सूरत हवाईप्रवास नोव्हेंबरपासून

Patil_p

मराठा इन्फंट्री उभारणार देशातील सर्वात उंच अशोक स्तंभ

Omkar B

• देशबांधवांना संसर्गाची धास्ती नको म्हणूनच…

Patil_p

पणसोली येथे हत्ती दिन साजरा

Omkar B

शिवाजी महाराजांचे युद्धकौशल्य अफलातून

Amit Kulkarni
error: Content is protected !!