तरुण भारत

‘लोकमान्य’ तर्फे सिल्व्हर ज्युबिली ऑफर गुंतवणूक योजना

किमान 20 हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास 27 महिन्यांत 25 हजार रुपयांचा परतावा मिळवता येणार

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि., ने अर्थ जगतात आपल्या व्यावसायिक कार्यप्रणालीच्या जोरावर विविध क्षेत्रात यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करत गरुड भरारी घेतली आणि सहकाराच्या या क्षेत्रात 25 वर्षे विश्वासाहर्ता, व्यावसायिकता आणि पारदर्शकता या सूत्रावर वित्त, शिक्षण, आरोग्य, विमा या क्षेत्रात यश संपादन केले आहे.

तसे पाहता संस्थेची 31 ऑगस्ट 1995 रोजी स्थापना झाली. सामाजिक बांधिलकीतून संस्थेचे संस्थापक मा. श्री किरण ठाकुर यांनी ज्या वेळेस या संस्थेचा श्रीगणेशा केला तेव्हा तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, लघुउद्योजकांसाठी पतनिर्मिती करणे आणि संस्थेच्या सभासदांना सर्वोत्तम परतावा देणे, ही तीन प्रमुख ध्येये अधोरेखित करत कार्यप्रणाली आखली गेली. त्याला स्थापनेपासूनच उच्च तंत्रज्ञान, व्यावसायिक व्यवस्थापन आणि पारदर्शक कारभाराची जोड दिली गेली. ज्यामुळे ही यशोभरारी संस्थेस शक्मय झाली आणि आजमितीस महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि दिल्ली राज्यातून 213 शाखा व 4800 कोटींच्या ठेवी यासह संस्था कार्यरत आहे.

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने सादर करण्यात आलेल्या ‘लोकमान्य सिल्व्हर ज्युबिली ऑफर’ या योजनेस ग्राहक, सभासद, गुंतवणूकदारांचा लक्षणीय प्रतिसाद मिळत आहे. या योजनेत ग्राहक, सभासद, गुंतवणूकदारांना किमान 20 हजार रुपये व त्या पटीत रक्कम गुंतविता येणार आहे. योजनेत किमान 20 हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास 27 महिन्यांत 25 हजार रुपयांचा परतावा मिळवता येणार आहे.

लोकमान्य सोसायटीच्या कोणत्याही शाखेत संपर्क साधून ग्राहक, सभासद, गुंतवणूकदारांना या योजनेचा लाभ घेता येईल, असे आवाहन लोकमान्य सोसायटीतर्फे करण्यात आले आहे.

Related Stories

शेतकरी-कामगारांसाठी चळवळ हाती घेणे गरजेचे

Patil_p

जांबोटी-चोर्ला मार्गावरील कुसमळी पूल धोकादायक

Amit Kulkarni

बारावीच्या वर्गांनाही प्रारंभ

Patil_p

कोनवाळ गल्लीला दूषित पाणीपुरवठा

Amit Kulkarni

विकेंड कर्फ्यूत बस जाग्यावरच …

Amit Kulkarni

…अन् सांताक्लॉजने दिली सॅनिटायझरची भेट

Omkar B
error: Content is protected !!