तरुण भारत

मनसे नेते संदीप देशपांडेसह एकूण 4 जणांना अटक

  • विनापरवाना लोकल प्रवास केल्याप्रकरणी कारवाई 


ऑनलाईन टीम / मुंबई : 


मुंबईमध्ये सर्वसामान्यांसाठी पुन्हा एकदा लोकल सुरु व्हावी यासाठी मनसेने सोमवारी सविनय कायदेभंग आंदोलन केले. या आंदोलकांवर कारवाई करत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह एकूण 4 जणांना अटक करण्यात आली आहे. कर्जत लोहमार्ग पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली.  

Advertisements


अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु करण्यात आली, मात्र अजूनही लाखो प्रवासी रोज धक्के खात रस्ते मार्गाने प्रवास करत आहेत. एकीकडे राज्य सरकारने एसटी बसेस आणि इतर बसेस सुरु केल्या आहेत ज्यामध्ये प्रचंड गर्दी असते. मग लोकल का सुरु करत नाही, असा सरकारला सवाल विचारत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी काही दिवसांपूर्वीच सरकारला लोकल सुरु करण्यासाठी मुदत दिली होती. ती मुदत रविवारी संपल्याने, सोमवारी सविनय कायदेभंग करुन लोकल प्रवास करणार असे त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार काल सकाळी संदीप देशपांडे यांच्यासह नवी मुंबई मनसे अध्यक्ष गजानन काळे आणि इतर दोघांनी शेळू ते नेरुळ असा लोकलने प्रवास केला. त्यानंतर या प्रवासाचे व्हिडीओदेखील प्रसारित केले आणि सरकारला परवानगीशिवाय लोकलमधून प्रवास करुन दाखवले. 


दरम्यान, संदीप देशपांडे सह एकूण 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आज सकाळी त्यांना अटक करण्यात आली आहे.  

Related Stories

”मुख्यमंत्र्यांना संघर्ष नको असेल तर त्यांनी संवादातून मार्ग काढावा”

triratna

मोदींविरोधात पोस्टरबाजी ; दिल्लीत 25 जणांना अटक

Patil_p

महाराष्ट्रात 17,066 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P

दिल्ली कायद्याला राष्ट्रपतींची मान्यता

Patil_p

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाड दौऱ्यावर; दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करणार

Rohan_P

यंदा नोकरभरती नाही; राज्य सरकारचा मोठा निर्णय

datta jadhav
error: Content is protected !!