तरुण भारत

ट्रम्प यांना विषाचे पाकीट पाठवणाऱ्या महिलेस अटक

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावे व्हाईट हाऊसमध्ये ‘रिसिन’ नावाचे घातक विष असलेले पाकीट पाठवणाऱ्या महिलेला न्यूयॉर्क-कॅनडा सीमेवर कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी अटक केली. 

Advertisements

मागील चार दिवसांपूर्वी ट्रम्प यांच्या नावे संबंधित महिलेने ‘रिसिन’ नावाचे घातक विष असलेले पाकीट पाठवले होते. हे पार्सल ट्रम्प यांच्याकडे पोहचण्यापूर्वी व्हाईट हाऊसमधील अधिकाऱ्यांनी ते 2 वेळा तपासले. त्यामध्ये हे कारस्थान उघड झाले होते. फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) आणि सिक्रेट सर्व्हिस या प्रकरणाचा तपास करत होते. तपासादरम्यान, अमेरिका सीमा संरक्षण अधिकाऱ्यांनी या महिलेला बफेलो येथे पीस ब्रिज सीमा ओलांडताना ताब्यात घेतले आहे. 

काय आहे रिसिन?

रिसिन हा एक विषारी पदार्थ आहे, जो एरंडेलच्या बियांमधून निघतो. हे विष शरीरात गेले तर त्या व्यक्तीला उलट्या सुरु होतात. तसेच पोटात आणि आतड्यांमध्ये अंतर्गत रक्तस्त्राव सुरु होतो. त्यामुळे किडनी फेल होऊ शकते.

Related Stories

उत्तर प्रदेशात एका दिवसात 1155 नवे कोरोना रुग्ण; मृतांची एकूण संख्या 785 वर

Rohan_P

छत्तीसगडमध्ये 6 ऑगस्टपर्यंत वाढवले लॉक डाऊन

Rohan_P

दिल्लीतील कोरोना : सद्य स्थितीत संसर्ग दर 0.41%

Rohan_P

महाविकास आघाडीत पुन्हा नाराजी नाट्य; आता अशोक चव्हाण नाराज

Rohan_P

कन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी काँग्रेसमध्ये दाखल

triratna

“…अन्यथा कोकणवासीय ‘कोल्हापुरी चप्पल’ हातात घेऊन नवाब भाईंचं स्वागत करतील..!”

triratna
error: Content is protected !!