तरुण भारत

इम्रान खान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय एकवटले

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय विरोधक एकवटले आहेत. सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंट नावाची आघाडी उघडली आहे. ही आघाडी इम्रान यांच्या राजीनाम्यासाठी देशभर निदर्शने करणार आहे. 

Advertisements

विरोधकांच्या डेमोक्रॅटिक मुव्हमेंट आघाडीची नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीला नवाज शरीफ यांच्या पक्षाचे प्रतिनिधी, उलेमा ई इस्लाम फजल आणि अन्य प्रमुख पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत 26 कलमी संयुक्‍त जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. 

पाकिस्तानातील इम्रान खान सरकार बरखास्त करून पुन्हा पारदर्शक पद्धतीने सार्वत्रिक निवडणुका घ्याव्यात, अशी डेमोक्रॅटिक मुव्हमेंट आघाडीची मागणी आहे. या मागणीसाठी ही आघाडी पुढील महिन्यांपासून देशव्यापी आंदोलन छेडणार आहे. 

Related Stories

लाख-कोटींमध्ये नव्हे, केवळ 86 रुपयांत घर

Patil_p

15 वर्षांत वाढली एव्हरेस्टची उंची

Patil_p

पाकिस्तान ‘एफएटीएफ’च्या ग्रे यादीत कायम

Amit Kulkarni

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 45 लाखांच्या उंबरठ्यावर

datta jadhav

जगभरातील कोरोनामुक्ती 10 कोटींनजीक

datta jadhav

लॉकडाऊनचे समर्थन

Patil_p
error: Content is protected !!