तरुण भारत

मेक्सिकोत कोरोनाबाधितांच्या संख्येने गाठला 7 लाखांचा टप्पा

ऑनलाईन टीम / मेक्सिको सिटी : 

मेक्सिकोत कोरोनाबाधितांच्या संख्येने 7 लाखांचा टप्पा गाठला आहे. मेक्सिकोत आतापर्यंत 7 लाख 580 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 73 हजार 697 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

Advertisements

मेक्सिकोत सोमवारी 3542 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 235 जणांचा मृत्यू झाला. 7 लाख रुग्णांपैकी 5 लाख 02 हजार 982 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 1 लाख 23 हजार 901 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 2568 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. 

कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत मेक्सिकोचा जगात सातवा क्रमांक लागतो. तर कोरोनाबळींच्या संख्येत चौथा क्रमांक लागतो. मेक्सिकोत आतापर्यंत 15 लाख 89 हजार 975 नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

Related Stories

पोर्तुगालातही इच्छामरणाची अनुमती मिळणार

Patil_p

भारतापुढे पाकिस्तानची घाबरगुंडी

Patil_p

तिसरा डोस देणारा पहिला देश ठरला इस्रायल

Patil_p

#TokyoParalympics : गूगलचे खास डूडल पाहिले का ?

triratna

बेल्जियममध्ये संचारबंदी

Patil_p

जर्मनीत नवे रूग्ण

Patil_p
error: Content is protected !!