तरुण भारत

कोल्हापूर : विनामास्क ग्राहकांना सेवा देणार्‍या व्यापाऱ्यांवर कारवाई करा

मुख्याधिकारी निखिल जाधव यांचे आदेश

प्रतिनिधी / कुरुंदवाड

Advertisements

कुरुंदवाड नगरपरिषद, कुरुंदवाड पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शहरांमध्ये विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून आतापर्यंत 36 हजर 600 रुपये दंड वसूल केला आहे. सध्या शहरात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या आदेशानुसार विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कुरुंदवाड नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी दंडात्मक कारवाई सुरू केली असून गेल्या तीन दिवसात या संयुक्त कारवाईत नागरिकांकडून 36 हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

रविवारी जिल्हाधिकारी दौलतराव देसाई यांनी स्वतः एका दुकानदारावर कारवाई केल्यानंतर नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सर्व व्यापाऱ्यांना विनामास्क ग्राहकाला सेवा दिल्यास दुकान सील करण्याचे आदेश दिले असून त्यानुसार कारवाई करणार असल्याचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी स्पष्ट केले आहे. यानुसार प्रत्येक दुकानदारांनी विनामास्क सेवा दिली जाणार नाही असे फलक लावले आहेत. दरम्यान याबाबत मंगळवारी नगरपालिका प्रशासनाने मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार्सल सेवा न देता ग्राहकांना आत बसून सेवा देणाऱ्या थिएटर चौकातील दोन रेस्टॉरंटवर कारवाई करून सात दिवसासाठी ती रेस्टॉरंट सील करण्यात आले आहेत.

दोन रेस्टॉरंटवर कारवाई करून सात दिवसासाठी सील करण्यात आले.

नगरपालिका प्रशासन पोलिस प्रशासनाच्या मदतीने येथील शिवाजी महाराज पुतळा चौक, व मजरेवाडी कॉर्नर येथे विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांच्या वरील दंडात्मक कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. ही कारवाई कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे, विकास अडसूळ, सुहास रोकडे नगरपालिका मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व पालिका कर्मचारी राबवत आहेत.

Related Stories

कडवी नदी पुर्नजिवनाचे काम नाम फाउंडेशनच्या सहकार्यातून होणार

Abhijeet Shinde

कोल्हापूर : या खड्ड्यांच करायचं काय?, शहरातील वाहनधारक त्रस्त

Abhijeet Shinde

कोल्हापूर : तुळशी जलाशय ‘ ८३ टक्के भरले

Abhijeet Shinde

केआयटीच्या विद्यार्थ्यांची सिरम इन्स्टिट्यूटमध्ये निवड

Abhijeet Shinde

कोल्हापूर : सावे येथे तीन वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार, संशयितास अटक

Abhijeet Shinde

‘हेल्पर्स’ पुरस्काराच्या अनिता दांडेकर ‘अपंगमित्र’ च्या मानकरी

Sumit Tambekar
error: Content is protected !!