तरुण भारत

सातारा : ‘त्या’ वनकर्मचाऱ्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

सपोनि डॉ.सागर वाघ यांच्या प्रयत्नांना यश


प्रतिनिधी/नागठाणे
पिरेवाडी (ता.सातारा) येथील ओंकार शामराव शिंदे या युवकाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पंचवीस हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंगळवारी कोर्टाने फेटाळून लावले. बोरगाव पोलीस गुंगारा देणाऱ्या या चौघांचा शोध घेत आहेत.
३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी शिवारातील पिकांचे माकडांपासून रक्षण करण्यासाठी गेलेल्या ओंकार शिंदे या युवकाला वनविभागाच्या चार कर्मचाऱ्यांनी पकडून त्याला शिकारीच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. यावेळी त्याला मारहाण करून त्याच्याकडून कोऱ्या कागदावर सह्या घेऊन हाताचे ठसेही घेतले. त्याच्याकडे एक लाख रुपयांची मागणी करत त्याच्या कुटुंबियांकडून पंचवीस हजार रुपये उकळले होते.
५ सप्टेंबरला या घटनेची फिर्याद ओंकार शिंदे याने बोरगाव पोलीस ठाण्यात दिली होती.पोलिसांनी वनपाल योगेश गावित,वनसंरक्षक महेश सोनवले,रणजित काकडे व किशोर ढाणे यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून हे चारही वनकर्मचारी पोलिसांना गुंगारा देत आहेत. त्यापैकी वनपाल योगेश गावित व वनसंरक्षक महेश सोनवले यांनी सातारा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश शरद पवार यांचे कोर्टात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता.यावेळी सहाय्यक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता मिलिंद ओक यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, प्रथमदर्शनी त्यांनी खंडणी मागितली आहे. तसेच टेलिफोन कनेक्टिव्हिटी आहे. जे साक्षीदार आहेत त्यांनी सर्वांनी वर्गणी स्वरूपात पैसे गोळा करून खंडणी देण्यासाठी दिले आहेत. खंडणी घेतल्याचे दिसत आहे. वनपाल योगेश गावित व वनरक्षक महेश सोनवले हे दोघे गुन्ह्यात सहभागी आहेत. वनविभागाचा दाखल गुन्हा हा २४ तासाचे आत रजिस्टर होऊन तो वनपरिक्षेत्र अधिकारी यांचेकडे जाणे गरजेचे आहे मात्र तसे झालेले नाही.तसेच गावित हे स्वतः वनपाल असल्याने त्यांनी स्वतःच्या बचावाकरीता खोटी कागदपत्रे तयार केली आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल राठोड यांनी सपोनि डॉ. सागर वाघ यांना खोटी माहिती दिली होती.जो कायदा यापूर्वी संपुष्टात आला आहे आणि नवीन कायदा लागू झाला आहे. त्यात त्यांनी खोटी माहिती दिल्याचे दिसत आहे. तसेच खंडणीची रक्कम वसुल होणे कामी या दोघांनाही पोलीस कस्टडी मिळणे गरजेचे असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.
यावेळी बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि डॉ.सागर वाघ यांची भूमिका महत्वाची ठरली.त्यांनी या गुन्ह्याचा तपास स्वतःकडे घेऊन योगेश गावित प्रकरणातील कोल्हापूर ते सातारा वनविभाग इथपर्यंतची सर्व कागदपत्रे त्यांनी स्वतःच गोळा केली. न्यायालयात देखील त्यांनी स्वतः हजर राहून या प्रकरणाची बाजु मांडली.

Advertisements

Related Stories

साताऱ्यात परप्रांतीयांना लुटणारे तिघे जेरबंद

Abhijeet Shinde

सातारा जिल्हा बँक चेअरमनपदी नितीन काका, तर व्हाईस चेअरमनपदी अनिल देसाई

Sumit Tambekar

एमआयडीसीतील कंपनीतून पावणे दोन लाखांचे साहित्य चोरीस

Patil_p

हुल्लडबाजांनो सावधान! अन्यथा गाठ माझ्याशी

datta jadhav

सातारा जिल्ह्यात 983 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज

Abhijeet Shinde

खूनप्रकरणी फलटणच्या एकास जन्मठेप

Patil_p
error: Content is protected !!