तरुण भारत

ई कॉमर्स कंपन्यांचा व्यवसाय 50 हजार कोटींवर

दसरा, दिवाळीत व्यवसायात तेजीः रेडसीरच्या अहवालात माहिती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

कोरोना महामारीमुळे व्यवसायांमध्ये मंदी आली असून येत्या काळात सणासुदीच्या दिवसांमध्ये ई कॉमर्स कंपन्यांचा व्यवसाय 51.52 हजार कोटी रुपयांवर पोहचेल असा अंदाज रेडसीरने आपल्या अहवालामधून वर्तवला आहे.  मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास दुप्पट व्यवसाय राहणार असल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

भारतासहीत जगभरातील कोरोनाचा प्रभाव तेजीत राहिला होता. याचे परिणाम व्यवसायांवर पडलेले आहेत, हे आपण जाणतोच. दुसरीकडे ई कॉमर्स व्यवसाय येत्या काळात चांगली कामगिरी करू शकतो, असे दिसते. दसरा दिवाळीपर्यंत ईकॉमर्सचा व्यवसाय तेजीत राहणार असल्याचा अंदाज आहे. याच दरम्यान ई कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांमध्ये ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टची विक्री वधारली असून दोघांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विशेष सवलत देण्याच्या योजना आखल्या जात आहेत. यामध्ये ऍमेझॉनचा ग्रेट इंडियन शॉपिंग फेस्टिव्हल आणि फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल ऑफर्स याचा वाटा अधिक राहिला आहे. तसेच रेडसीरच्या अहवालानुसार फेस्टिव्हल सेलच्या ऑफरमध्ये जवळपास 30 हजार कोटीपर्यंत विक्री होण्याचा अंदाज आहे.

अर्थव्यवस्थेवर प्रभाव शक्य

सध्या जीडीपीच्या आकडेवारीत विक्रमी 23.9 टक्क्यांची घसरण आली आहे. यामध्ये आर्थिक पातळीवरील अडचणीत वाढ झाली आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये ई कॉमर्स क्षेत्रात तेजी आल्यास अर्थव्यवस्थेला दिलासा मिळण्याचे संकेत आहेत. यातून लाखोंना रोजगार प्राप्त होणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. 

ई कॉमर्सचा बाजार

साधारणपणे बाजारात स्वस्तातील 4 जी डाटा उपलब्ध होत असल्याच्या कारणामुळे ऑनलाईन बाजारात विक्रीत तेजी वाढत जाणार आहे. यामध्ये सर्वात मोठा हिस्सा हा रिलायन्स जिओचा राहणार आहे. यामध्ये जिओने ग्राहकांसाठी सर्वात कमी किमतीत इंटरनेटचा डाटा देण्यास सुरुवात केली होती. भारतीय ई कॉमर्स बाजारात सद्यस्थितीत 3.68 लाख कोटी रुपयांवर पोहोचला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Related Stories

मायक्रोसॉफ्टने दिली कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होमची परवानगी

datta jadhav

लॉकडाऊनमुळे रोख व्यवहारांमध्ये घट

Patil_p

सोलार निर्मितीत 15 कंपन्या गुंतवणुकीच्या तयारीत

Patil_p

बाजारातील सलगच्या घसरणीला अखेर विराम !

Patil_p

सिम्पल एनर्जीचा इलेक्ट्रिक दुचाकीचा मोठा कारखाना

Patil_p

जागतिक स्मार्टफोन बाजारात पुन्हा सॅमसंग अव्वल

Patil_p
error: Content is protected !!