तरुण भारत

रियलमीचे कमी किंमतीचे फोन बाजारात

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

चिनी स्मार्टफोन कंपनी रियलमीने नारजो 20 सीरीज अंतर्गत तीन फोन्स सादर केले आहेत. यामध्ये रियलमी नारजो 20, 20 ए आणि नारजो 20 प्रो यांचा समावेश आहे. ग्राहकांना परवडतील असे दर या तीन फोन्सचे ठेवण्यात आले आहेत.

नारजो 20 आणि 20 ए मध्ये वॉटरड्रॉप स्टाइल डिस्प्ले आहे. तसेच नारजो 20 प्रो मध्ये पंच होल डिझाइन असून कॅमेरा सेटअपमध्ये 20 आणि 20 ए तीन रियर कॅमेरे आहेत. नारजो 20 प्रो मध्ये चार रियर कॅमेरे दिले आहेत.

नारजोची किंमत

भारतीय बाजारामध्ये रियलमीचा नारजो 20 4-जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज फोनची किंमत 10,499 रुपये असून 128 जीबी स्टोरेज फोनची किंमत 11,499 रुपये राहणार आहे. अन्य प्रकारातील फोन्सची किंमत 8,499आणि 9,499 इतकी राहणार असल्याचे रियलमीने स्पष्ट केले आहे. नारजो 20 प्रोची पहिली विक्री शुक्रवारी 25 सप्टेंबरच्या दिवशी दुपारी 12 वाजता सुरु होणार आहे.

Related Stories

ई-फसवणुकीपासून सावधान

tarunbharat

‘पोको एम 3’ स्मार्टफोनचे सादरीकरण

Patil_p

फेसबुकची ऑनलाईन शॉपिंगची सुविधा

Patil_p

इनफिनिक्स झिरो 8 आय बाजारात

Patil_p

फाईव्ह जी टॅबलेट

Omkar B

सॅमसंग गॅलेक्सी एम 11 चे सादरीकरण

tarunbharat
error: Content is protected !!