तरुण भारत

दुसऱया दिवशी सेन्सेक्स 300 अंकांनी घसरला

निफ्टी 11,200च्या खाली : आयटी-फार्माचे समभाग तेजीत

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

चालू आठवडय़ात सलग दुसऱया दिवशी मंगळवारीही शेअर बाजारात घसरणीचे वातावरण राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये दिवसभरातील कामगिरीनंतर सेन्सेक्स 300 अंकांनी प्रभावीत होत बंद झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने आशियासह अन्य बाजारातील नकारात्मक वातावरणाच्या प्रभावामुळे तेजीच्या प्रवासाकडे वाटचाल करणाऱया कंपन्या घसरणीसह बंद झाल्या आहेत.

प्रमुख कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, एचडीएफसी आणि मारुती सुझुकीचे समभाग घसरुन बंद झालेत. यामुळे दिवसअखेर सेन्सेक्स 300.6 अंकांनी घसरुन निर्देशांक 37,734.08 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 96.90 अंकांसह 11,153.65 वर बंद झाला आहे.

दुसऱया दिवशी मंगळवारी नुकसान झालेल्या कंपन्यांमध्ये मारुती सुझुकीचे समभाग सर्वाधिक 3 टक्क्मयांनी प्रभावीत झाले आहेत. तसेच सोबत अन्य कंपन्यांमध्ये लार्सन ऍण्ड टुब्रो, इंडसइंड बँक, ऍक्सिस बँक, ओएनजीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेन्ट्स आणि एचडीएफसी या कंपन्यांचा समावेश राहिला आहे. दुसऱया बाजूला नफ्यात राहिलेल्या कंपन्यांमध्ये एचसीएल टेक, टीसीएस, सन फार्मा आणि टेक महिंद्रा यांचा समावेश राहिलेला आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढल्याच्या कारणामुळे विविध देशांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. यामुळे उद्योग, व्यवसाय काही काळ ठप्प राहिल्याचा परिणाम  म्हणून जगभरातील प्रमुख बाजारातील विक्रीच्या प्रभावामुळे भारतीय बाजारात घसरण राहिल्याची नोंद केली आहे.

कोविड संसर्गाच्या परिणामाने आर्थिक स्थिती नुकसानीत राहिली आहे. तसेच दुपारी बाजारात तेजीसह सुधारणा राहिली होती. परंतु सदरची तेजी कायम राखण्यात बाजाराला अपयश आले. जागतिक बाजारातील आशियामधील चीनचा शांघाय, हाँगकाँग आणि दक्षिण कोरियाचा सोल हे बाजार नुकसानीसह बंद झाले आहेत. तसेच युरोपातील बाजार सकारात्मक राहिले आहेत. ब्रेंट क्रूडचा दर 1.30 टक्क्मयांच्या तेजीसह 41.98 डॉलर प्रति बॅरेलवर राहिला होता.

Related Stories

युटीआय म्युच्युअलचे आयपीओमधून 3,500 कोटी उभारण्याचे ध्येय

Patil_p

फॅशन उद्योगामध्ये तेजी

Patil_p

व्होडाफोन,आयडियाची 3 जी सेवा लवकरच बंद

Patil_p

प्राप्तीकर रिटर्न फॉर्म बिनचूक कसा भरावा?

Omkar B

जेएसडब्ल्यू स्टीलने उत्पादन घटवले

Patil_p

सेन्सेक्स 50 हजारांपार

datta jadhav
error: Content is protected !!