तरुण भारत

कोल्हापुरात आज गोलमेज परिषद; मराठा आरक्षण आंदोलनाचे बिगुल वाजणार

प्रतिनिधी / कोल्हापूर

मराठा आरक्षण आंदोलनाचे बुधवारी राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूरातून बुगल वाजणार आहे. मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या पुढाकाराने राज्यस्तरीय गोलमेज परिषद आयोजित केली असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे. मंगळवारी संयोजकांनी सानेगुरुजी वसाहत येथील रावजी सांस्कृतिक भवन येथे होणाऱया परिषदेच्या तयारीची पाहणी केली. राज्यभरातील 54 संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यातील बहुतांश प्रतिनिधी मंगळवारीच दाखल झाले.

Advertisements

   संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्यासह विजयसिंह महाडिक, भरत पाटील, शिवाजीराव लोंढे, प्रसाद जाधव, विक्रमसिंह जरग, पुंडलिक जाधव, सचिन साठे यांनी गोलमेज परिषदेच्या ठिकाणाची पाहणी केली. बुधवारी दुपारी 12 वाजता या परिषदेला प्रारंभ होणार आहे. राज्यातील विविध संघटनांचे प्रतिनिधी दाखल व्हायला मंगळवारी सुरुवात झाली.

   कोरोनाचे नियम पाळून परिषद

  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सचे पालन करुन सभागृहात विविध संघटनांच्या प्रतिनिधींसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. परिषदेसाठी येणाऱया प्रतिनिधींना प्रवेशद्वारावरच सॅनिटायझर, मास्क दिले जाणार आहेत. प्रवेश करताना त्यांचे थर्मल स्पॅनरद्वारे टेम्परेचर तपासले जाणार आहे.  या गोलमेज परिषदेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहीले आहे. येथून मराठा आंदोलनाची दिशा ठरुन रणशिंग फुंकले जाणार आहे.

Related Stories

माजी महापौर सई खराडे लवकरच राष्ट्रवादीत; मंत्री मुश्रीफ यांच्या भेटीनंतर चर्चेला उधान

Abhijeet Shinde

मुंबईतून बॉलीवूड कुणीही हलवू शकणार नाही : चंद्रकांत पाटील

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आस्थापने सुरु करण्यास परवानगी मिळावी

Abhijeet Shinde

प्रतिकुल वातावरणामुळे कस्तुरीने थांबवली एव्हरेस्ट मोहिम

Abhijeet Shinde

थकबाकीदार वीजग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडीत करू नका : चंद्रकांत जाधव

Abhijeet Shinde

डॉ.अर्थवने घेतली ‘हायरेंज रेकॉर्ड’झेप..!

Abhijeet Shinde
error: Content is protected !!