तरुण भारत

क्रोएशियाचा रॅकिटिकची फुटबॉलमधून निवृत्ती

वृत्तसंस्था/ बार्सिलोना

क्रोएशियाचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू तसेच बार्सिलोना संघातील मध्यफळीत खेळणारा 32 वर्षीय इव्हान रॅकिटिकने सोमवारी आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रातून आपली निवृत्ती जाहीर केली.

Advertisements

2018 साली रशियात झालेल्या फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत उपविजेतेपद मिळविणाऱया क्रोएशिया फुटबॉल संघामध्ये त्याचा समावेश होता. त्याने आपल्या वैयक्तिक फुटबॉल कारकीर्दीत 106 आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये क्रोएशियाचे प्रतिनिधीत्व करताना 15 गोल नोंदविले. निवृत्तीच्या निर्णयापूर्वी आपण क्रोएशियाचा कर्णधार मॉड्रिक तसेच प्रशिक्षक डेलिक आणि क्रोएशिया फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष सुकेर यांच्याशी आपण चर्चा केल्याचे रॅकिटिकने सांगितले. बार्सिलोना संघाचे त्याने सहा वर्षे प्रतिनिधीत्व केले होते. या उन्हाळी मोसमात बार्सिलोनातून आपला पूर्वीचा क्लब सेव्हिलामध्ये तो दाखल झाला होता.

Related Stories

सेहवाग म्हणतो, शास्त्रींना सद्यस्थिती माहीत नाही, असे होऊच शकत नाही!

Omkar B

हॉकी स्पर्धा आयोजनासाठी निमंत्रण

Patil_p

शेवटच्या वनडेत भारतीय महिलांचा विजय

Patil_p

इंग्लंड संघात बटलर, लीचचे पुनरागमन

Patil_p

नदालच्या शानदार कामगिरीमुळे स्पेन अंतिम फेरीत

Patil_p

आशियाई ऑलिंपिक पात्रता स्पर्धेसाठी पाच महिला मल्लांची निवड

Patil_p
error: Content is protected !!