तरुण भारत

दीपक ढवळीकर गोमेकॉत

हृदयविकाराचा झटका : प्रकृती स्थीर

प्रतिनिधी/ फोंडा

मगो पक्षाचे अध्यक्ष तथा माजी सहकारमंत्री दीपक ढवळीकर यांना हृदयविकाराचा झटका आल्याने उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थीर असून उपचार सुरु असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

 दीपक ढवळीकर यांना मंगळवारी सायंकाळी 4.30 वा. सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने फोंडा येथील सावईकर नर्सिंग होममध्ये नेण्यात आले. तेथील डॉक्टर्सनी प्राथमिक तपासणी करुन गोमेकॉत नेण्याचा सल्ला दिला. सायंकाळी 6 वा. त्यांना गोमेकॉतील कार्डिओलॉजी विभागात दाखल करण्यात आले. डॉ. मंजुनाथ देसाई व डॉ. शिरीष बोरकर यांच्या देखरेखीखाली त्यांच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या. मात्र अँजीओग्राफी करण्यासंबंधीचा निर्णय रात्री उशिरापर्यंत झाला नव्हता. महिन्याभरापूर्वी ते कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने मणिपाल इस्पितळात त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. सध्या बांदोडा येथील निवासस्थानी ते विश्रांती घेत होते.

 दरम्यान त्यांचे बंधू व मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी दीपक ढवळीकर यांच्या प्रकृतीविषयी माहिती देताना, त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचे  सांगितले. त्यांची प्रकृती स्थीर असून काळजी करण्याचे कुठलेच कारण नसल्याचे एका संदेशात म्हटले आहे.

Related Stories

प्रत्येकाचा संघर्ष वेगळा आणि गुंतागुंतीचा : दिग्दर्शक रामन रसौली

Shankar_P

कोरगावात 20 लाखाचा गांजा जप्त

Patil_p

कोरोन्टाईनच्या नावाखाली पोलिसांनी रात्रभर गोमंतकीय विद्यार्थ्यांना मोले चेकपोस्टवर अडवून ठेवले

Omkar B

गोमंतक मराठा समाजातर्फे 7 रोजी महिला सशक्तीकरण कार्यक्रम

Patil_p

जनजागरणासाठी बाहेर पडलेल्या तिबेटी सायकल यात्रेकरूचे वास्कोत आगमन

Patil_p

सांताक्रूझ येथे गोळी लागून युवकाचा मृत्यू

Patil_p
error: Content is protected !!