तरुण भारत

भाजपतर्फे मुख्यमंत्र्याच्या हस्ते ‘ई-पुस्तका’चे प्रकाशन

महामारीच्या काळातील कार्याचे संकलन

प्रतिनिधी/ पणजी

गोव्यात 22 मार्च पासून जेव्हापर्यंत लॉकडाऊन होते तोपर्यंत आणि आता देखील आमच्या पक्षाचे मंत्री, आमदार, व कार्यकर्ता समाजात लोकांच्या मदतीसाठी वावरत आले आहे. पक्ष स्तरावर पुढाकार घेत लोकांना मदत केले आहे. हे कामाचे संकलन करणे आवश्यक होते. जेणेकरुन भविष्यात अशाप्रकारे संकट आल्यास कशाप्रकारे हाताळू शकतात हे पुढच्या पिढीला कळायला सोपे होणार आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

मंगळवारी पणजी येथील भाजप कार्यालयात आयोजित ‘सेवा ही संघटन’ या ई-पुस्तकाच्या प्रकाशन सोहळय़ावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत प्रमुख पाहूणे या नात्याने ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे. सरचिटणीस ऍड. नरेंद्र सावईकर, दामु नाईक, व ई-पुस्तकाच्या समितीचे प्रमुख सिध्दार्थ कुंक्कळकर उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते या ई-पुस्तकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.

समाजात काम करताना कित्येक पक्षाचे मंत्री, आमदार, कार्यकर्ते स्वतः पोझिटीव्ह झाले. महामारीच्या काळात सर्वानी एकत्रित येऊन काम करणे गरजेचे होते. या दरम्यान गोव्यातील लोकांसोबत गोव्यात अडकून पडलेल्या इतर राज्यातील लोकांनासुध्दा मोठय़ा प्रमाणात सरकारने तसेच पक्षाने देखील मदत केली. असे डॉ. सावंत यांनी पुढे सांगितले.

मार्च 25 ते 31 मे या लॉकडाऊनच्या काळात भाजपच्या कार्यकर्त्यानी देशभर लोकांची सेवा केली. आमच्या राज्यातील कार्यकर्त्यांनी देखील कानाकोपऱयापर्यंत ज्यांना मदतीची गरज होती त्यांना मदत केली. या कार्याचे संकलन हेतू या ई-पुस्तकाचे नियोजन केले आहे. केद्रातून या पुस्तकासाठी आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे सिध्दार्थ कुंक्कळकर यांच्या अध्यक्षतेखालील समीतीने सदर ई-पुस्तक तयार केले आहे. असे सदानंद शेट तानावडे यांनी यावेळी सांगितले. आमच्या कार्यकर्त्यानी राज्यात या महामारीच्या काळात 1 लाख, 12 हजार, 765 लोकांना शिजवलेले अन्न, 4 लाख, 34 हजार, 780 लोकांना मोफत रेशन, 3 लाख 15 हजार लोकांना मोफत मास्क, व 2 लाख 15 हजार लोकांना सॅनिटायझर बॉटल्स वाटण्यात आल्या. असे तानावडे यांनी पुढे सांगितले.

Related Stories

कडधान्याचे 374 ट्रक गोव्यात दाखल : मुख्यमंत्री

Patil_p

बेघर मजुरांना ठेवलेल्या नावेलीतील इनडोअर स्टेडियमची पाहणी

Patil_p

खनिज वाहतुकीचे नवे दर निश्चित

Patil_p

भर रस्त्यात भरणारा चोपडेचा मासळी बाजार अपघातास देतोय निमंत्रण

GAURESH SATTARKAR

विश्वासार्हता म्हणजे ‘लोकमान्य’ सोसायटी

Patil_p

1.20 कोटी फसवणूक प्रकरण आज 14 रोजी मडगाव कोर्टात

omkar B
error: Content is protected !!