तरुण भारत

गिरी येथे घरात ट्रक घुसल्याने घराचे नुकसान

प्रतिनिधी/ म्हापसा

गिरी म्हापसा येथे मंगळवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास गिरी चर्चजवळ राहणाऱया शशिकांत नाईक यांच्या घरात ट्रक घुसल्याने घराचे बरेच नुकसान झाले. केवळ दैव बलवत्तर म्हणून घरातील मंडळी काही कामानिमित्त बाहेर गेली होती त्यामुळे जिवीतहानी टळली. मिळालेल्या माहितीनुसार हा ट्रक क्लिनर घेऊन पुढे गेला होता तर चालक बाजूला झोपला होता. दोघांनीही अती मद्य प्राशन केल्याने ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघातानंतर चालक व क्लिनरने घटनास्थळावरून पळ काढल्याचे उघडकीस आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आंध्रप्रदेश येथील एपी-02 X- 6228 हा ट्रक घेऊन संतोष संगप्पा सज्जन हा गोव्यात आला होता. सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास म्हापसा बोडगेश्वर मंदिराजवळ पणजी म्हापसा रस्त्याच्या बगलमध्ये जाणाऱया रस्त्याच्या बाजूला गाडी लावून ड्रायव्हर व क्लिनरने दारू प्राशन केल्यावर तेथे रेडीओ लावून नृत्यही केले. नंतर तेथे मासे विक्री करणारा इसम आल्यावर त्याने ट्रक पुढे नेण्यास सांगितल्यावर चालक संतोष अती मद्य प्राशन केल्याने ट्रकमध्ये झोपला असता क्लिनरने ट्रक स्टार्ट मारून पणजीच्या दिशेने नेला असता गिरी चर्चजवळ पोचल्यावर क्लिनरचा स्टेरींगवरचा ताबा गेल्याने त्याने ट्रक बाजूला घरावर मारून घेतला असता शशिकांत नाईक याचे घर पूर्णपणे कोसळून पडले. त्यात त्यांच्या घरातील भांडी, टीव्ही संच, पॅन, रेडीओ, खुर्च्या, घरातील सामानाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळाल्यावर आजुबाजूचे तसेच पणजी म्हापसा ये-जा करणारे लोक जमा झाले.

अपघातानंतर क्लिनर व ड्रायव्हर घटनास्थळावरून म्हापसा व दुसऱयाने पणजीच्या दिशेने पलायन केले असता लोकांनी दोघांनाही पकडले व नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. क्लिनरला परवाना नव्हता तर ट्रकमालकास भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता हे चालक आपल्या नकळत ट्रक घेऊन पसार झाल्याचे सांगितले. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शिवाजी शेटकर अधिक तपास करीत आहेत.

Related Stories

गुरुवारी तब्बल 95 बाधित, 64 जण मुक्त

Patil_p

न्यायालयातील कर्मचाऱयांविरुद्ध सरन्यायाधीशांकडे तक्रार

Omkar B

लॉकडाऊनच्या काळात 9 टन भाजीपाला सेंद्रिय पद्धतीने पिकविला, 2 हेक्टर जमिनीत आता प्रथमच बासमती भाताची लागवड करणार

Omkar B

मरिनावर सरकारने येत्या दोन दिवसात आपली भूमिका स्पष्ट करावी

Amit Kulkarni

चिखली कोलवाळ येथे बांध फुटल्याने पाणी शेतात

Omkar B

सत्तरी तालुक्मयातील कोरोना पोझीटिव्ह रुग्णांची संख्या 7 वर

Omkar B
error: Content is protected !!