तरुण भारत

पंतप्रधान मोदींनी 5 वर्षात केले 58 देशांचे दौरे; 517.82 कोटी खर्च

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मार्च 2015 ते नोव्हेंबर 2019 या 5 वर्षांच्या काळात 58 देशांचे दौरे केले. या दौऱ्यांवर एकूण 517.82 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती सरकारने मंगळवारी संसदेत दिली. 

Advertisements

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेतील खासदार फौजिया खान यांनी पंतप्रधान मोदींनी मागील पाच वर्षात किती परदेश दौरे केले आणि त्यासाठी किती खर्च झाला याची माहिती मागवली होती. त्यावर परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी लेखी उत्तर दिले. मुरलीधरन यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी यांच्या 2015 पासून ते आतापर्यंतच्या दौऱ्यावर 517.82 कोटी रुपये खर्च झाला. मोदींच्या दौऱ्यामुळे द्विपक्षीय, क्षेत्रीय आणि वैश्विक मुद्द्यांवर भारताच्या दृष्टीकोनाबाबत इतर देशांना माहिती मिळाली. तसेच इतर देशांची भारताचे संबंध आणखी दृढ झाले.

भारताने अनेक देशांशी करार केले. यामध्ये व्यापार, गुंतवणूक, संरक्षण यासह मोठ्या क्षेत्रात सामंजस्य करारही झाले आहेत. त्यामुळे कोरोना संकटात जपान, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इस्त्राईलकडूनही भारताला मदत मिळाली आहे. भारतानेही 150 देशांना औषधे, वैद्यकीय उपकरणांची मदत केली आहे.

Related Stories

गरिबांना दिवाळीपर्यंत मिळणार मोफत धान्य ; पीएम मोदींची मोठी घोषणा

triratna

आता 28 नव्हे 56 दिवसानंतर मिळणार ‘कोविशिल्ड’चा दुसरा डोस

datta jadhav

‘तौक्ते’ शमण्याच्या बेतात, गुजरातमध्ये प्रवेश

Patil_p

राष्ट्रपती ४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान कर्नाटक, आंध्र प्रदेशला भेट देणार

triratna

93 वर्षांचे झाले लालकृष्ण अडवाणी

Patil_p

देशात 18,222 नवे बाधित, 228 मृत्यू

datta jadhav
error: Content is protected !!