तरुण भारत

कोल्हापूर : अंगणवाडी सेविकांचा बहिष्कार कायम

प्रतिनिधी / कोल्हापूर

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या बहिष्कारचा निर्णय कायम असून या बाबतचा अंतिम निर्णय राज्य पातळीवरील कृती समीती घेईल तो पर्यत कोणतेही काम करणार नाही, असा इशारा अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे कॉम्रेड अतुल दिघे यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना दिले आहे.

Advertisements

महिला बाल कल्याण मंत्री विद्या ठाकूर यांचेबरोबरची झूम मिटिंग होऊ शकली नाही ती परत मिळावी असा प्रयत्न करणार आहोत. अंगणवाडीची नियमित कामे व ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ हे एकाच वेळी करणे लाभार्थ्यांसाठी धोकादायक आहे. व त्यामुले अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकडून लाभार्थी कुटुंबे सेवा नाकारतील हा धोका शासनाने समजूनच घेतला पाहिज़े अशी भूमिका दिघे यांनी मांडली

अंगणवाडी सेविका, मदतनीसाना सुरक्षा साधनांचा पुरवठा केला जाईल,सुरक्षा साधनाशिवाय कोणीही काम करु नये. ज्या अंगणवाडी सेविका, मदतनीसांचा कोरोणा संसर्गाने मृत्यू झाला आहे, त्यांना शासकीय नियमानुसार 5 लाखची विमा रक्कम लवकरात लवकर अदा केली जाईल. अंगणवाडी सेविका, मदतनीसाना कोरोना झाल्यास त्यांच्यासाठी प्रत्येक शासकिय कोविड सेंटर मधे दोन बेड राखीव ठेवले जातील. आंगणवाडी सेविका, मदतनीसांना कोरोणा उपचारासाठी सर्व प्रकारची औषधे मोफत उपलब्ध केली जातील. अंगणवाडी सेविका,मदतनींसाना खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ज्यादा बिलाची अकारणी केली असल्यास त्यांच्या वर कारवाई करण्यात येईल, गेल्या 6 महिन्यात अंगणवाडी सेविका, मदतनीसांनी केलेल्या कामाबद्दल प्रोत्साहनपर भत्ता देण्याबाबत शासनस्थरावर पाठपुरावा करण्यात येईल. आदी मुद्दांवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीला अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने कृती समिती सदस्य सुवर्णा तळेकर, कॉ. आप्पा पाटील, आर्चना पाटील, अनिता माने तसेच जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी आधिकारी सोमनात रसाळ आदी उपस्थित होते.

Related Stories

हिंगणगाव येथील मंजूर रस्ता गेला चोरीला

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांची उद्या घंटा वाजणार

Abhijeet Shinde

पेठ वडगावात लाचप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल व दोन पंटर लाचलुचपतच्या जाळ्यात

Abhijeet Shinde

प्राध्यापक भरती त्वरित सुरू करावी

Abhijeet Shinde

नो रिऍक्शन..! कोल्हापुरात कोव्हॅक्सिन लसिकरणास उत्स्फुर्त प्रतिसाद

Abhijeet Shinde

`जुन्या पेन्शन योजने’साठी सरकारी कर्मचारी रस्त्यावर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!