तरुण भारत

सातारा : वाईच्या तरुणांची धोम बलकवडी धरणाला सायकलवरून प्रदक्षिणा

७१ किलोमीटरचा प्रवास सायकल ग्रुपने केला आठ तासात पूर्ण
मेणवली वेशीपासून पहाटे साडे पाचला सुरुवात अन् समारोप दुपारी दीड वाजता गणपती घाटावर

प्रतिनिधी / वाई

Advertisements

वाई तालुक्याला निसर्गाचे कोंदण लाभले आहे. सोनजाईचा समोर तर पाठीमागे पांडवगड, पश्चिमेला धोम बलकवडी धरण. जांभळी खोरे असं खुलवून टाकणार सौंदर्य आहे. या भागाची सायकलवरून रपेट करणे म्हणजे वेगळंच धाडस. वाई येथील सायकल ग्रुपने तब्बल ७१ किलोमीटरची धोम बलकवडी ही प्रदक्षिणा आठ तासात पूर्ण केली. लॉकडाऊन काळात ही मोहीम वाईच्या सायकल ग्रुपने पार पाडली.

वाई शहराच्या पश्चिम भागाला निसर्गाची वेगळी झालर आहे. धोम धरणाच्या दोन्ही बाजूने रस्ता आहे अगदी तो रस्ता तीन नद्यांच्या खोऱ्यांचे दर्शन घडवतो. धोम बलवडी धरण प्रदक्षिणा पूर्ण करण्याचा मानस वाईच्या सायकल ग्रुपने व्यक्त करत प्रत्यक्षात या मोहिमेत आशिष ससाणे, आरती कोल्हापूरे, किर्ती ओसवाल, धनंजय कराळे, निखिल कराळे, साहिल वखारकर, अमर कोल्हापरे, ओंमकार जाधव, विक्रांत येवले आणि पूजा पंडित असे सहभागी होऊन आपल्या सायकल सह पहाटे पाच वाजता जमले.आणि मेणवलीच्या वेशी पासून सुरुवात झाली. धोम, आसरे, जेधेवाडी असा घाट रस्ता, चढ उतार चढत सायकली जांभळी खोऱ्यात पोहचल्या.

जांभळी खोऱ्यात कमंडलू नदी, पुढे वाळकी नदी व बलकवडी धरण करत आकोशीवरून समोर कमळगड उभा पाहून आणखी त्यांचा उत्साह वाढवत हा ग्रुप बोरगाव मार्गाने धोम धरणाच्या पलीकडच्या बाजूला निघाला. धोम धरणाचा जलाशय, पाखरांची कानी पडत असलेली किलबिलाट अशा वातावरणात दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गणपती घाटावर सर्वजण पोहचले. सर्वांच्या मनात एक वेगळा आनंद होता तो म्हणजे धोम धरण प्रदक्षिणा पूर्ण केल्याचा. यामध्ये महिला ही सहभागी झाल्या होत्या.

Related Stories

मांडवे येथे पुन्हा ढगफुटी

Patil_p

शिवाजी विद्यापीठात संभाजी महाराज संशोधन केंद्र करा

Patil_p

जिल्हय़ात कोरोनाचा वाढता कहर

Patil_p

गायब फाईल पोहोचली पालिकेत

Amit Kulkarni

सातारा : …अन्यथा मुख्याधिकाऱ्यांच्या केबीनमध्ये भटकी कुत्री सोडू

datta jadhav

बुधवार, गुरुवार कमी दाबाने पाणी पुरवठा होणार

datta jadhav
error: Content is protected !!