तरुण भारत

चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर गुन्हा दाखल

लैंगीक शोषण केल्याप्रकरणी अभिनेत्री पायल घोषणे केला गुन्हा दाखल

प्रतिनिधी/मुंबई

Advertisements

प्रसिद्ध चित्रपट निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात लैंगीक शोषण केल्याप्रकरणी अभिनेत्री पायल घोषणे वर्सोवा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केल्याने, एकच खळबळ माजली आहे. अनुराग कश्यपने लैंगिक शोषण केल्याचा आरोप पायलने केला असुन, याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गेले तीन ते चार दिवस ही अभिनेत्री आणि अनुराग कश्यप यांच्यात ट्विटर युद्ध सुरू होते. मात्र 2015 साली अनुरागने आपल्यावर त्याच्या घरी अतिप्रसंग करून, डांबून ठेवल्याचा आरोप या अभिनेत्रीने केला आहे. या अनुषंगाने अभिनेत्रीने तिच्या वकिलांसह गुन्हा नोंदवण्यासाठी प्रथम ओशिवरा पोलीस ठाणे गाठले होते. मात्र अनुराग कश्यप हा वर्सोवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहात असल्याने अखेर हा गुन्हा वर्सोवा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला. शनिवारी बॉलिवूड अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट करत दिग्दर्शक अनुराग कश्यपने तिच्यासोबत जबरदस्ती केल्याचे आरोप केले होते. एवढेच नाहीतर तिने एक पोस्ट करीत या प्रकरणी पंतप्रधान मोदी यांच्याकडे मदतही मागितली होती. अभिनेत्रीने दावा केला आहे की, ही घटना 2014-15 मधील आहे.

अनुराग कश्यपने या बॉलिवूड अभिनेत्रीद्वारे करण्यात आलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे सांगितले होते. त्याने रविवारी ट्विटरवर प्रतिक्रिया देत सांगितले होते की, काय प्रकरण आहे, मला शांत करण्याचा प्रयत्न करण्यासाठी खूप वेळ लागला. चला ठिक आहे. मला शांत करता, करता एवढं खोटं बोललं गेलं की, एक महिला असूनही दुसऱया एका महिलेलाही आपल्यासोबत खेचून आणलं. थोडी तरी मर्यादा ठेवा मॅडम. मी फक्त एवढंच सांगेन की, जे काही आरोप केले आहेत त्यामध्ये काहीही तथ्य नाही. अनुराग कश्यपने अभिनेत्रीने केलेल्या आरोपांसंदर्भात इतरही अनेक ट्वीट केले आहेत. तर याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

राजस्थान अथवा बिहारसाठी कोणतीही रेल्वे कोल्हापुरातून जाणार नाही – जिल्हाधिकारी दौलत देसाई

Abhijeet Shinde

भिलवडी परिसरामध्ये वादळी पावसामुळे मोठे नुकसान

Abhijeet Shinde

पुणे विभागातील 5 लाख 61 हजार 151 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा अन्यायकारक शासन आदेश रद्द झालाच पाहिजे

Abhijeet Shinde

कोल्हापूरला येणारच, हिम्मत असेल तर अडवून दाखवा, किरीट सोमय्यांचं राष्ट्रवादीला आव्हान

Abhijeet Shinde

कमानी हौद कारंजे बंदच

Patil_p
error: Content is protected !!